प्रवासी वाहनांच्या क्षेत्रात ‘महिंद्रा ऑटो’ विभागात एप्रिल 2021मध्ये मागील महिन्यापेक्षा 9.5 टक्क्यांची वाढ; या महिन्याभरात एकूण वाहनांची विक्री 36,437 युनिट

या वर्षीच्या एप्रिल महिन्यातील वाहन विक्रीच्या आकडेवारीची एप्रिल 2020 मधील आकडेवारीशी तुलना करता येणार नाही; याचे कारण कोविड साथ व टाळेबंदी यांमुळे गेल्या वर्षी एकही वाहन विकले गेले नव्हते

    मुंबई : सुमारे 19.4 अब्ज डॉलर्स उलाढाल असलेल्या महिंद्रा समुहातील ‘महिंद्रा अँड महिंद्रा लि.’ या कंपनीच्या एकूण वाहनांची विक्री (प्रवासी वाहने + व्यावसायिक वाहने + निर्यात) एप्रिल 2021 या महिन्यात 36,437 इतकी झाल्याचे कंपनीतर्फे आज घोषित करण्यात आले.

    या वर्षीच्या एप्रिल महिन्यातील वाहन विक्रीच्या आकडेवारीची एप्रिल 2020 मधील आकडेवारीशी तुलना करता येणार नाही; याचे कारण कोविड साथ व टाळेबंदी यांमुळे गेल्या वर्षी एकही वाहन विकले गेले नव्हते.

    युटिलिटी वाहनांच्या विभागात, ‘महिंद्रा’ने एप्रिल 2021 मध्ये 18,186 वाहने विकली. प्रवासी वाहनांच्या विभागात (यूव्ही, कार आणि व्हॅन) एप्रिल 2021 मध्ये 18,285 इतक्या वाहनांची विक्री झाली.

    ‘एम अँड एम लि.’च्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी वीजय नाकरा म्हणाले, “एप्रिल महिन्यात आमच्या प्रवासी वाहनांच्या विभागात मार्च 2021 च्या तुलनेत 9.5 टक्के वाढ नोंदली गेली. देशातील अनेक भागात टाळेबंदीचे निर्बंध वाढले आहेत. अशावेळी पुरवठा साखळी संबंधित उत्पादनामध्ये आव्हाने निर्माण होतील, असा आमचा अंदाज आहे. मागणी चांगली असली, तरी टाऴेबंदीच्या निर्बंधामुळे ग्राहकांकडून खरेदीचे व्यवहार कमी होतील आणि वितरकांची उलाढालही कमी होईल; परिणामी पहिल्या तिमाहीत काही प्रमाणात आमच्या व्यवसायावर परिणाम होईल. अशा परिस्थितीत आमचे सर्व सहयोगी आणि वितरक यांचे हित व सुरक्षा यांवरच आमचे सर्व लक्ष केंद्रित आहे. आमच्या ग्राहकांना अ-प्रतिबंधित वैयक्तिकृत तसेच डिजिटल व संपर्कविरहीत विक्री आणि सेवा यांचा अनुभव कायम मिळत राहील.”