जगातील सर्वात वेगवान कार बाजारात, १५ मिनिटांच्या चार्जिंगवर 300 KM रेंज ; जाणून घ्या दमदार फिचर्स

टेस्ला मॉडेल एस प्लेड (S Plaid) या कारमध्ये 1020 हॉर्स पॉवर क्षमतेचं इंजिन देण्यात आलं आहे, जे केवळ 2 सेकंदात 0 ते 60mph पर्यंतचं स्पीड घेऊ शकते. म्हणजेच ही कार पोर्शेपेक्षा वेगवान आहे. तसेच ही कार व्होल्वोपेक्षा सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे. टेस्लाच्या या मॉडेलची टॉप स्पीड 200mph (321 किमी प्रतितास) इतकी आहे.

    टेस्ला मॉडेल एस प्लेड (Tesla Model S Plaid) ही जगातील सर्वात वेगवान कार असल्याचा दावा केला जात आहे. ही कार अमेरिकेत अधिकृतपणे लाँच करण्यात आली आहे. टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क स्वत: ही कार चालवत घेऊन आले आणि त्यांनी ही कार सादर केली.

    टेस्ला मॉडेल S Plaid ही कार 129,990 डॉलर्स इतक्या किंमतीत लाँच केली आहे. ही रक्कम भारतीय चलनात रूपांतरित केली तर या कारची किंमत सुमारे 95 लाखांपर्यंत आहे. आधी या गाडीची किंमत 119,990 डॉलर्स इतकी निश्चित करण्यात आली होती. मात्र 24 तासांच्या आतच वाहनाची किंमत वाढविण्यात आली.