Lucid Motors : फुल चार्ज केल्यानंतर 800 किलोमीटरहून अधिक चालणारी कार

Lucid मोटर्स आपली पहिलीवहिली कार Air आणण्याच्या तयारीत आहे. ही कार 9 सप्टेंबरला सादर करण्यात येणार आहे. फुल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक कार 800 किलोमीटरहून अधिक चालते.

मुंबई : एक नवी इलेक्ट्रिक कार येत आहे. आपल्या वेगाच्या बाबतीत ही कार एक आदर्श निर्माण करणार आहे. ही कार कॅलिफोर्नियाची स्टार्ट अप कंपनी Lucid मोटर्सची आहे. हिचे नाव Air इलेक्ट्रिक सेदान आहे. द सनच्या अहवालानुसार, फुल चार्ज केल्यानंतर Lucid मोटर्सची ही कार 517 मैल (जवळपास 832 किलोमीटर) चालते. ही कार 2021 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. कंपनीने वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ही कार कॅलिफोर्नियाच्या १७० व्या वर्धापनदिनानिमित्त 9 सप्टेंबर 2020 रोजी सादर करण्यात येणार आहे.

2.5 सेकंदात 100 किलोमीटरचा वेग

अहवालानुसार, Lucid मोटर्सच्या या कारची रेंज टेस्ला (Tesla) च्या टॉप-इंड कार्सपेक्षा अधिक असणार आहे. Lucid Air इलेक्ट्रिक कार 2.5 सेंकदाहूनही कमी वेळेत 100 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते असं कंपनीने म्हटलं आहे. Lucid गेल्या काही वर्षांपासून या कारवर काम करत होती. कंपनीने मंगळवारीच घोषणा केली आहे की तिच्या नव्या सेदानचा अंदाजे वेग 517 मैल (832 किलोमीटर) असणार आहे.

ही असेल कारची किंमत

Lucid मोटर्सचे सीईओ पीटर रॉलिन्सन यांच्या मते, सुरुवातीला Air इलेक्ट्रिक सेदानची किंमत 100,000 डॉलरहून अधिक (जवळपास 75 लाख रुपये) असेल. ही कार सर्वात अधिक वेगवान कार टेस्लाचे मॉडल S आहे, जी एकदा चार्ज केल्यानंतर 400 मैलांहून अधिक (जवळपास 640 किलोमीटर) चालते. टेस्ला मॉडल S सेदानची किंमत 75,000 डॉलर (जवळपास 56 लाख रुपये) पासून सुरू होते.

इलेक्ट्रिक कारचे स्वस्त वेरियंटही आणणार कंपनी

Lucid चे सीईओ रॉलिन्सन म्हणाले की, या इलेक्ट्रिक कारचे कमी किंमतीतील वेरियंटही नंतर येणार आहेत. स्वतंत्रपणे केलेल्या चाचणीत या कारचा वेग तपासण्यात आला असल्याची माहिती कंपनीने दिली. Lucid Air नंतर कंपनी वर्ष 2023 च्या सुरुवातीलाच एक SUV सादर करणार आहे, जी याच व्हेईकल प्लॅटफॉर्मवर तयार झालेली असेल अशी माहितीही रॉलिन्सन यांनी दिली. टेस्लाच्या मॉडेल 3 चा वेग जवळपास 518 किलोमीटर आहे. तर एकदा चार्ज केल्यावर जग्वार I-Pace चा वेग जवळपास 470 किलोमीटर आहे.