महिंद्रा इलेक्ट्रिक घेऊन येत आहे 373 किमी रेंजची कार; टाटा नेक्सॉनला देणार थेट टक्कर

या मॉडलला कंपनी दोन वेरियंट मध्ये लाँच करू शकते. यात स्टँडर्ड व्हेरियंटची रेज 200 किलोमीटर च्या जवळपास असू शकते. या कारच्या लाँचिंगची तारीख कंपनीकडून अद्याप जाहीर करण्यात आली नाही. परंतु, असे मानले जात आहे की, या कारला कंपनी 2021 च्या अखेरपर्यंत किंवा 2022 च्या सुरुवातीला लाँच करू शकते.

    महिंद्रा इलेक्ट्रिकने eXUV300 कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयुव्ही ऑटो एक्सपो 2020 मध्ये आणले होते. भारतात याला कंपनी यावर्षीच्या अखेरपर्यंत लाँच करू शकते. या कारच्या संबंधी जी माहिती समोर आली आहे. त्यानुसार, ही कार 375 किलोमीटरची मोठी रेंज सोबत येणार आहे. या मॉडलला कंपनी दोन वेरियंट मध्ये लाँच करू शकते. यात स्टँडर्ड व्हेरियंटची रेज 200 किलोमीटर च्या जवळपास असू शकते. या कारच्या लाँचिंगची तारीख कंपनीकडून अद्याप जाहीर करण्यात आली नाही. परंतु, असे मानले जात आहे की, या कारला कंपनी 2021 च्या अखेरपर्यंत किंवा 2022 च्या सुरुवातीला लाँच करू शकते. या कारद्वारे कंपनी इलेक्ट्रिक मार्केटमध्ये आपले मार्केट शेयर वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे.

    टाटा नेक्सॉनला देणार थेट टक्कर

    महिंद्राच्या या कारची टक्कर थेट टाटा नेक्सॉन शी होणार आहे. टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक भारतातील सर्वांत यशस्वी इलेक्ट्रिक कार आहे. या कारला आता महिंद्राची ही कार थेट टक्कर देणार आहे. टाटा नेक्सॉन सध्या 312 किलोमीटरची रेंज ऑफर करते.