Mahindra XUV300 झाली स्वस्त, 87129 रुपये द्यावे लागणार कमी

Mahindra XUV300 चे दोन वेरियंट वगळता बाकी सर्व वेरियंटच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. ही एक्सयुव्ही पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिन प्रकारात येते. महिंद्राने येणाऱ्या दोन नव्या एसयुव्ही- किआ सोनोट आणि टॉयोटा अर्बन क्रुजर यांना गृहीत धरून एक्सयुव्ही 300 च्या किंमतीत बदल केले आहेत असं मानलं जात आहे.

मुंबई : Mahindra ची सब-कॉम्पॅक्ट एक्सयुव्ही XUV300 स्वस्त झाली आहे. कंपनीने Mahindra XUV300 चं डिझेल मॉडेलचे W4 आणि W6 वेरियंट्स वगळता बाकी सर्व वेरियंटची किंमत कमी केली आहे. XUV300 ची किंमत 87,129 रुपयांनी कमी झाली आहे. किंमत कमी झाल्यानंतर आता एक्सयुव्हीची किंमत 7.95 लाख ते 11.75 लाख रुपयांदरम्यान झाली आहे. तर या आधी हिची किंमत 8.30 लाख ते 12.14 लाख रुपयांदरम्यान होती.

पेट्रोल मॉडेलच्या किंमतीत सर्वाधिक घट

महिंद्रा XUV300 च्या पेट्रोल मॉडेलच्या W8 (O) वेरियंटची किंमत सर्वात अधिक 87,129 रुपयांनी कमी झाली आहे. यानंतर W8 वेरियंटच्या किंमतीत 70 हजार, W6 च्या किंमतीत 17 हजार, आणि W4 वेरियंटच्या किंमतीत 35 हजार रुपयांची घट झाली आहे.

डिझेल मॉडेलच्या किंमतीत काय झाला बदल?

एक्सयुव्हीच्या डिझेल मॉडेलबाबत सांगायचं झालं तर, W8 वेरियंटची किंमत 20 हजार रुपये आणि W8 (O) ची किंमत 39हजार रुपयांनी कमी झाली आहे. दुसरीकडे डिझेल मॉडेलच्या W6 आणि W4 वेरियंट्सची किंमत अनुक्रमे 20 हजार आणि 1 हजार रुपयांनी वाढली आहे. कंपनीने नव्याने येणाऱ्या दोन एसयुव्ही किआ सोनेट आणि टोयोटा अर्बन क्रुजर यांना गृहीत धरूनच एक्सयुव्ही 300 च्या किंमतीत बदल केले असल्याचे मानले जात आहे.

महिंद्रा एक्सयुव्ही 300 ची नवी आणि जुनी किंमत (डिझेल मॉडेलपैकी W4 आणि W6 वेरियंटच्या किंमतीत वाढ)

वेरियंट जुनी किंमत नवी किंमत किंमतीत घट
         W4 पेट्रोल            8.30 लाख 7.95 लाख 35 हजार
         W6 पेट्रोल            9.15 लाख 8.98 लाख 17 हजार
W8 पेट्रोल 10.60 लाख 9.90 लाख 70 हजार
W8 ऑप्शनल पेट्रोल   11.84 लाख    10.97 लाख 87,129 रुपये
W4 डीजल 8.69 लाख 8.70 लाख 1 हजार (वाढ)
W6 डीजल 9.50 लाख 9.70 लाख 20 हजार (वाढ)
W8 डीजल 10.95 लाख 10.75 लाख 20 हजार
W8 ऑप्शनल डीजल 12.14 लाख 1.75 लाख 39 हजार

 

इंजिनचे पर्याय

महिंद्रा XUV300 मध्ये 1.2 -लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 1.5-लीटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिनचे पर्याय उपलब्ध आहेत. पेट्रोल इंजिन 110 bhp उर्जा आणि 200 Nm टॉर्क, तर डिझेल इंजिन 115 bhp उर्जा आणि 300 Nm टॉर्क निर्माण करते. दोन्ही इंजिनांसोबत अधिकृत 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स येतो. डिझेल इंजिनसोबत 6-स्पीड AMT गिअरबॉक्सचाही पर्याय उपलब्ध आहे.