Mahindra XUV500 झाली स्वस्त, ऑटोमॅटिक वेरियंट झालं लाँच

नवी दिल्ली : वैश्विक साथरोग कोरोनामुळे (corona) जगभरात सर्वांचेच बुरे दिन सुरू आहेत. याचा फटका ऑटोमोबाइल (automobile) सेक्टरलाही बसला आहे.

अनेक कंपन्या तोट्यात सुरू असून आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवत आहेत. पण महिंद्राने आपली XUV500 ची किंमत कमी केलीआहे. कंपनीने या गाडीची किंमत जवळपास 16,000 रुपयांनी कमी केली आहे. कंपनीने गेल्याच आठवड्यात आपल्या मिनी एसयुव्ही XUV300च्या दरात कपात केली होती.

Mahindra XUV500 ची किंमत

महिंद्राच्या एसयुव्हीचे भारतीय बाजारात चार वेरियंट्स उपलब्ध आहेत, ज्यात Mahindra XUV500 W5 वेरियंटची किंमत 13.10 लाख रुपये आहे. हिची जुनी किंमत 13.20 लाख रुपये होती. म्हणजेच कंपनीने या वेरियंटची किमत १० हजार रुपये वाढविली आहे.

Mahindra XUV500 W9 वेरियंटची किंमत 16.04 लाख रुपये आहे. हिची जुनी किंमत 16.20 लाख रुपये होती. कंपनीने या वेरियंटची किंमत १६ हजार रुपये वाढविली आहे.

Mahindra XUV500 W11 (O) वेरियंटची किंमत 17.54 लाख रुपये आहे. हिची जुनी किंमत 17.70 लाख रुपये होती. कंपनीने या वेरियंटची किंमतची 16 हजार रूपये वाढविली आहे. या सगळ्या एसयुव्हीच्या दिल्लीतील एक्स-शोरूम किंमती आहेत.

इंजिन आणि पावर (ऊर्जा)

Mahindra XUV500 त 2179 cc चे पावरफुल इंजिन दिले आहे, जे 155 bhp ची अधिकाधिक ऊर्जा आणि 320 Nmचा पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनला 6-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन गिअर्स आहेत. यात 2.2-लीटर डिझेल इंजिन दिले आहे. कंपनीने BS6 कंप्लायंटची XUV500 एप्रिल 2020 मध्ये भारतात लाँच केली होती.

ऑटोमॅटिक वेरियंट लाँच

महिद्राने ऑटोमॅटिक ट्रांसमिशन असलेली BS6 Mahindra XUV500 लाँच केली आहे. हिच्या W7 ऑटोमॅटिक ट्रांसमिशन वेरियंटची किंमत 15.65 लाख रुपये आहे. तर, हिच्या W9 AT वेरियंटची किंमत 17.36 लाख रुपये आहे. या गाडीच्या W11(O) वेरियंटची किंमत 18.88 लाख रुपये आहे.