maruti suzuki

मारुती सुझुकी(Maruti Suzuki Recalls 1 Lakh 81 Thousand Cars) कंपनीने १ लाख ८१ हजार गाड्या परत मागवणार असल्याचे म्हटले आहे. सियाझ(Ciaz), एर्टिगा(Ertiga), विटारा ब्रेझा (Vitara Brezza), एस-क्रॉस(S-Cross) आणि एक्सएल ६( XL6) च्या काही पेट्रोल व्हेरियंट्स परत मागवण्यात येणार आहेत.

    मारुती सुझुकीने(Maruti Suzuki) एक मोठी घोषणा केली आहे. मारुती सुझुकी(Maruti Suzuki Recalls 1 Lakh 81 Thousand Cars) कंपनीने १ लाख ८१ हजार गाड्या परत मागवणार असल्याचे म्हटले आहे. सियाझ(Ciaz), एर्टिगा(Ertiga), विटारा ब्रेझा (Vitara Brezza), एस-क्रॉस(S-Cross) आणि एक्सएल ६( XL6) च्या काही पेट्रोल व्हेरियंट्स परत मागवण्यात येणार आहेत. या सर्व मॉडेल्सच्या गाड्या ४ मे २०१८ ते २७ ऑक्टोबर २०२० या कालावधीत तयार करण्यात आल्या आहेत. या मॉडेल्सच्या १ लाख ८१ हजार ७५४ युनिट्समध्ये काही त्रुटी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या त्रुटींची तपासणी केली जाणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

    “ग्राहकांच्या हितासाठी, मारुती सुझुकीने मोटार जनरेटर युनिटची तपासणी करून मोफत रिप्लेसमेंट किंवा वाहनं पुर्णपणे बदलून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्रुटी असलेल्या वाहन मालकांना मारुती सुझुकीच्या अधिकृत वर्कशॉप्समधून सांगण्यात येईल. तसेच त्रुटी असलेल्या पार्ट्सची रिप्लेसमेंट करण्याचं काम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल. सियाझ, एर्टिगा, विटारा ब्रेझा, एस-क्रॉस आणि एक्सएल ६ च्या मॉडेल्सची वाहनं ज्यांच्याकडे आहेत, त्यांनी ती पाण्यामध्ये चालवू नये आणि वाहनांमध्ये इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक भागांवर थेट पाण्याची फवारणी करणं टाळावं,” असे कंपनीने कळवलं आहे.

    ज्या वाहनमालकांना त्याच्या कारमध्ये त्रुटी असल्याचा संशय आहे, त्यांनी कंपनीच्या www.marutisuzuki.com (for Ertiga and Vitara Brezza) तसेच www.nexaexperience.com (for Ciaz, XL6 and S-Cross) या वेबसाईटवर जाऊन ‘Imp Customer Info’ या भागाला भेट द्यावी. आणि त्यांच्या कारमध्ये काही त्रुटी असतील ज्या तपासण्याची गरज असेल तर तिथे वाहनाचा १४ अंकी चेसिस क्रमांक टाकावा. चेसिस नंबर वाहन आयडी प्लेटवर एम्बॉस्ड आहे आणि वाहन इनवॉईस/रजिस्ट्रेशन कागदपत्रांमध्ये देखील नमूद आहे.