Maruti च्या मिड साईज सेडानचा बाजारात बोलबाला, जाणून घ्या ?

सियाझ 2014 मध्ये भारतात लाँच करण्यात आली. BS6 कंप्लायंट सियाजची किंमत 8.60 लाख रुपयांपासून सुरू होते आणि अल्फा 1.5 लीटर पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरिएंटसाठी 11.59 लाख रुपयांपर्यंत जाते. मिड रेंज सेडान सेगमेंटमध्ये, Ciaz ची Honda City आणि Hyundai Verna सोबत जोरदार स्पर्धा आहे. 

    मुंबई : मारुती सुझुकीची (Maruti Suzuki) प्रीमियम सेडान सियाझने (Ciaz) आज विक्रीचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. भारतातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनीने याची पुष्टी केली आहे की, सियाझ आतापर्यंत 300,000 ग्राहकांना विकली गेली आहे.

    सियाझ 2014 मध्ये भारतात लाँच करण्यात आली. BS6 कंप्लायंट सियाजची किंमत 8.60 लाख रुपयांपासून सुरू होते आणि अल्फा 1.5 लीटर पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरिएंटसाठी 11.59 लाख रुपयांपर्यंत जाते. मिड रेंज सेडान सेगमेंटमध्ये, Ciaz ची Honda City आणि Hyundai Verna सोबत जोरदार स्पर्धा आहे.

    फीचर्स

    नवीन जनरेशन मारुती सियाझला 2018 मध्ये फेसलिफ्ट मिळाले होते, त्याला आकर्षक फ्रंट ग्रिल, स्लीक बंपर आणि डीआरएलसह एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प मिळतात. यात अनेक क्रोम गार्निश देखील मिळतात आणि ही सेडान स्टीयरिंग व्हील, दरवाजाच्या हँडलच्या आत, एसी लोव्हर नॉब आणि पार्किंग ब्रेक लीव्हरमध्ये दिसू शकते.