Seltos ला टक्कर देण्यासाठी येतेय मारुतीची नवी Vitara Brezza ; जाणून घ्या

व्हिटाला ब्रेझा ऑक्टोबरमध्ये लाँच केली जाणार आहे. तसेच या कारचा ग्लोबल सेल या वर्षाच्या शेवटी किंवा 2022 मध्ये सुरु होणार आहे. जागतिक बाजारात या कारची टक्कर Kia Seltos, Hyundai Kona, Toyota C-HR सारख्या कारसोबत होणार आहे. व्हिटारासह कंपनी एकूण तीन मॉडेल्स या वर्षी युरोपच्या बाजारात लाँच करणार आहे.

    जपानची ऑटोमोबाईल कंपनी सुझुकी (Suzuki) तिची जबरदस्त पॉप्युलर असलेली कॉम्पॅक्ट एसयुव्ही व्हिटारा (SUV Vitara) एसयुव्हीला फिनिशिंग टच देत आहे. कारचे नवीन मॉडेल अनेक मोठमोठे बदल करून बाजारात येणार आहे. यामध्ये नेक्स्ट जनरेशन मॉडेलची भारतातही वाट पाहिली जात आहे. या Vitara Brezza बाबत नवीन माहिती समोर येत आहे.

    व्हिटाला ब्रेझा ऑक्टोबरमध्ये लाँच केली जाणार आहे. तसेच या कारचा ग्लोबल सेल या वर्षाच्या शेवटी किंवा 2022 मध्ये सुरु होणार आहे. जागतिक बाजारात या कारची टक्कर Kia Seltos, Hyundai Kona, Toyota C-HR सारख्या कारसोबत होणार आहे. व्हिटारासह कंपनी एकूण तीन मॉडेल्स या वर्षी युरोपच्या बाजारात लाँच करणार आहे.

    मारुती ब्रेझामध्ये सध्या 1.5-लीटर K15B पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 103 bhp ताकद आणि 138 Nm टॉर्क तयार करते. यासोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा ऑप्शन देण्यात आला आहे. ऑटोमॅटीक गिअरबॉक्सच्या व्हेरिअंटमध्ये मारुतीची स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.