meet this 80 year old man who have 80 porsche cars nrvb
जेवढं वय, तेवढ्या आजोबांच्या मालकीच्या महागड्या कार... कार तयार करणाऱ्या कंपन्याही या वृद्धाच्या प्रेमात...

पोर्श चालवत असताना सिगारचे झुरके घेत सुनसान रसत्यांवर भरधाव कार चालवायला त्यांना प्रचंड आवडतं. पोर्श प्रशंसकांची जर यादीच करायची झाली तर त्यात याचं नाव निश्चितच अव्वल स्थानी असेल.

यांचा छंद ऐकून तुम्हाला धडकी भरायलाच हवी

असं म्हणतात छंद असेल तर वयाचा विषयच येत नाही. जर तुम्ही यात अडकून राहिलात तर तारुण्य- म्हातारपणाचे हे खेळ असेच सुरू राहतील. आवड असणं हीच मोठी गोष्ट आहे. त्याच्यासमोर सर्व गोष्टी गौण ठरतात. वियानात राहणाऱ्या एका चिरतरुण आजोबाचं वय ८० वर्ष असून या वयात त्यांच्याकडे ८० लक्झरी पोर्श कार आहेत.

ही झिंग वाढत गेलीये

वाढत्या वयासोबतच ओटोकारचं पोर्शचं असलेलं आकर्षण वाढतच गेलं. त्यांनी काही वर्षांत ८० पोर्श कार्सची सीरिज पूर्ण केली आहे. त्यांनी निळ्या रंगाची पोर्श बॉक्सस्टर स्पाइडर कार खरेदी केली. पोर्श चालवत असताना सिगारचे झुरके घेत सुनसान रसत्यांवर भरधाव कार चालवायला त्यांना प्रचंड आवडतं. पोर्श प्रशंसकांची जर यादीच करायची झाली तर त्यात याचं नाव निश्चितच अव्वल स्थानी असेल.

गोष्ट ५० वर्षांपूर्वीचं जुनं प्रकरण

पोर्श कारची त्यांची ही आवड ५० वर्षांपूर्वीच सुरू झाला असं ओटोकार सांगतात. त्यांनी आपल्या घराच्या मागच्या भागात तिला पाहिलं होतं. त्या क्षणापासूनच त्यांच्या मनात याविषयीची चलबिचल सुरू झाली. त्यांना कारच्या वेगाचं वेडच लागलं. काही वर्ष त्यांनी पैसे साठवायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी स्पीड येलो 911 विकत घेतली. ही त्यांची पहिलीवहिली पोर्श कार होती.

दररोज एक वेगळी कार चालवू शकता

ओटोकार यांनी हळूहळू काही वर्षांतच एक 917, एक विंटेज आठ-सिलेंडर इंजिनसह 910, 904ला आपल्या मूळ फ्यूहरमन इंजिन आणि 956 सोबत जोडली. त्यांनी ८० पोर्श कार खरेदी केल्या. आजच्या घडीला ३८ कार त्यांच्या मालकीच्या आहेत. ते दररोज एक वेगवेगळी पोर्श कार चालवतात असं त्यांनी सांगितलं.

लिव्हिंग रुम मध्ये ठेवतात कार

त्यांना फक्त गाड्या विकत घ्यायचीच आवड नाहीये. तर त्यांना ड्रायव्हिंगचीही आवड आहे. कार ठेवण्यासाठी त्यांनी भलंमोठं गॅरेज बांधलं आहे. एक संपूर्ण इमारत आहे ज्यात ते आपल्या सर्व कार पार्क करतात. या जागेला ते आपला लिव्हिंग रुम मानतात. त्यांच्याकडे रेसिंग कारही आहे. या कार तयार कंपनीही ओटोकार यांच्या प्रेमात आहेत.