ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीसह येणार MG Gloster SUV; फोर्च्युनर आणि एंडेवरला देणार टक्कर

MG Gloster SUV भारतीय बाजारात एमजी मोटरची चौथी कार असून ती ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीसह येणार आहे. मार्केटमध्ये हिची टक्कर टोयोटा फॉर्च्युनर आणि फोर्ट एंडेवर यांच्याशी असणार आहे. बोल्ड लूक असलेली एमजीची ही 7-सीटर प्रिमिअम एसयुव्हीत अनेक आकर्षक फीचर्स असणार आहेत.

मुंबई : एमजी मोटर भारतीय मार्केटमध्ये आपल्या प्रोडक्टची रेंज वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. अलीकडेच कंपनीने 6-सीटर एसयुव्ही हेक्टर प्लस लाँच केली आहे. आता एमजी 7-सीटर प्रीमियम एसयुव्ही Gloster आणण्याच्या तयारीत आहे. MG Gloster ऑटो एक्सपोमध्ये सादर करण्यात आली होती. ही फेस्टिव्ह सीझन दरम्यान लाँच होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारतीय मार्केटमध्ये हिची स्पर्धा टोयोटा फोर्च्युनर आणि फोर्ड एंडेवर सोबत असणार आहे. अलीकडेच ग्लॉस्टर टेस्टिंग दरम्यान पाहण्यात आली आहे. जाणून घेऊया या प्रीमियम एसयुव्हीबाबत काही खास गोष्टी.

फॉर्च्युनर आणि एंडेवर पेक्षा ऐसपैस

एमजी ग्लॉस्टर चीनमध्ये उपलब्ध Maxus D90 च्या धर्तीवर आधारित आहे. ही फोर्च्युनर आणि एंडेवरपेक्षा ऐसपैस आहे. हिची लांबी 5005mm, रुंदी 1932mm आणि ऊंची 1875mm आहे. यामुळे ही दिसायला खूपच भारदस्त दिसते.

बोल्ड लूक

ग्लॉस्टरच्या फ्रंटला क्रोम स्लैट्ससह मोठी ऑक्टागोनल ग्रील, LED DRL सह स्वेप्टबॅक LED प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, राउंड क्रोम बेजल सह फॉग लॅम्प आणि स्कल्प्टिड बंपर व हुड दिलं आहे. ड्युअल-टोन अलॉय व्हील्स, बोल्ड शोल्डर क्रीज, विंडो लाइन च्या चारही बाजूला क्रोम, रुफ रेल्स, क्रोम डोअर हँडल्स आणि एलईडी टेललॅम्प्स यामुळे एसयुव्हीचा आकर्षक लूक आणखी वाढतो.

आकर्षक फीचर्स

लीक झालेल्या फोटोनुसार हे स्पष्ट झालं आहे की, ग्लॉस्टरचे अधिकाधिक डिझाइन एलिमेंट्स मॅक्सस डी90 वर आधारित आहेत. ग्लॉस्टर एसयुव्हीमध्ये एमजीची कनेक्टेड कार आयस्मार्ट टेक्नॉलॉजी, फ्लॅट बॉटम 3-स्पोक स्टीयरिंग व्हील, ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सह 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, सनरूफ, वॉइस कमांड आणि लेदर सीट अपहोल्स्ट्री सारखे फीचर्स असण्याची शक्यता आहे.

पावरफुल एसयुव्ही

यात 2.0-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन असेल, ज्यात सोबतच 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्सचे पर्याय मिळणार आहेत. हे इंजिन 220bhpची पावर आणि  360Nm टॉर्क जनरेट करते. चीनमध्ये येणाऱ्या मॅक्सस डी90 मध्ये 215bhp पावरचे 2.0-लीटर ट्विन-टर्बो डिझेल इंजिन आहे, ज्यात 8-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्स आहे. कंपनी ग्लॉस्टरमध्ये डिझेल इंजिनचाही ऑप्शन देण्याची शक्यता आहे.

काय असेल किंमत?

एमजी ग्लॉस्टर लवकरच सादर करण्यात येणार आहे. हिची किंमत जवळपास 35 लाख रुपयांपासून सुरू होईल असा अंदाज आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा