mg hector facelift spy images surface ahead of launch
लाँच होण्याआधीच समोर आले नव्या MG Hector चे फोटो, बढ़िया आहे लुक

नवीन हेक्टरच्या किंमत अजूनही गुलदस्त्यातच आहे. कंपनीने अलीकडेच या कारचे ड्युअल टोन वेरियंटही लाँच केले होते. कारची किंमत 16.84 लाख रुपयांपासून 18.08 लाख रुपयांदरम्यान आहे.

नवी दिल्ली : ब्रिटिश कार निर्माता कंपनी MG भारत नवी अपडेटेड MG Hector लाँच करणार आहे. कंपनी २०२१ च्या पहिल्या महिन्यात ही कार भारतीय बाजारात आणणार आहे. आता MG Hector Facelift च्या अधिकृत लाँचपूर्वीच या कारचे फोटो समोर आले आहेत. ICN च्या अहवालानुसार हे फोटो या कारच्या TV कर्मशियल शूट दरम्यान घेतलेले आहेत.

यात काय असेल नवं

एमजी हेक्टर फेसलिफ्टच्या फ्रंटमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. आता ही कार नवीन ब्लॅक मेश ग्रिल आणि स्टेन ग्रे सराउंड्स सह येईल. याशिवाय या कारमध्ये स्प्लिट हेडलँप बंपर आणि फॉग लँपचा वापर करण्यात आला आहे. नवीन हेक्टरमध्ये कंपनी 18 इंच अलॉय व्हिलचा वापर करेल असा अंदाज आहे तथापि, ऑनगोइंग मॉडेलमध्ये 17 इंच अलॉय व्हिलचा वापर केला आहे.

काय असेल किंमत

नवीन हेक्टरच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. कंपनीने अलीकडेच या कारचे ड्युअल टोन वेरियंटही लाँच केले आहे. कारची किंमत आजमितीला 16.84 लाख रुपयांपासून ते 18.08 लाख रुपयांपर्यंत आहे.

संभाव्य इंजिन आणि गियरबॉक्स

हेक्टर फेसलिफ्टला कंपनी १.५ लीटर पेट्रोल, 2.0 लीटर डिझेल आणि 1.5 लीटर पेट्रोल माइल्ड-हाइब्रिड प्रकारात येण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेल दोन्ही व्हर्जनसाठी 6 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स मिळणार आहे. 1.5 लीटर पेट्रोल मॉडेल 6 स्पीड ड्युल क्लच ऑटोमेटिक गियरबॉक्स सोबतही उपलब्ध होणार आहे.