MG's Drive AI | १८ ऑगस्ट रोजी एमजीचा ‘ड्राइव्ह एआय’ इव्हेंट; काय असतील अपेक्षा?, ऑटो क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
ऑटो
Published: Aug 18, 2021 07:30 AM

MG's Drive AI१८ ऑगस्ट रोजी एमजीचा ‘ड्राइव्ह एआय’ इव्हेंट; काय असतील अपेक्षा?, ऑटो क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
१८ ऑगस्ट रोजी एमजीचा ‘ड्राइव्ह एआय’ इव्हेंट; काय असतील अपेक्षा?, ऑटो क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी

आज एमजी ऑटोमोटिव्ह क्षेत्रात आणखी एक इंडस्ट्री फर्स्ट उत्पादन आणण्यासाठी सज्ज झाले आहे. मोबिलिटीच्या भवितव्याचा दृष्टीकोन राखणारा आणि भारतीय ऑटोमोटिव्ह क्षेत्रासाठी अनंत संधी आणि उपाय प्रदान करण्यासाठी कार-एज-अ-प्लॅटफॉर्म (CAAP) वर कंपनीने भर दिला आहे.

  एमजी मोटर इंडियाने नेहमीच नावीन्यपूर्णतेच्या बाबतीत ऑटो क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. या ओईएमने (मूळ उपकरण उत्पादक) नेहमीच रस्त्यावर उत्तम धावणाऱ्या कार विकसित करण्यासह सर्वोत्तम तंत्रज्ञान वापरत ग्राहकांचा अनुभवही वाढवला आहे. एमजी मोटर्सने पहिली इंटरनेट कनेक्टेड कार ‘हेक्टर’, पहिली प्युअर इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘झेडएस इव्ही’, पहिली ऑटोनॉमस (लेवल-I) ग्लोस्टर सादर करत ऑटोमोटिव्ह उद्योगात क्रांती घडवून आणली आहे.

  आज, एमजी ऑटोमोटिव्ह क्षेत्रात आणखी एक इंडस्ट्री फर्स्ट उत्पादन आणण्यासाठी सज्ज झाले आहे. मोबिलिटीच्या भवितव्याचा दृष्टीकोन राखणारा आणि भारतीय ऑटोमोटिव्ह क्षेत्रासाठी अनंत संधी आणि उपाय प्रदान करण्यासाठी कार-एज-अ-प्लॅटफॉर्म (CAAP) वर कंपनीने भर दिला आहे. मोठा बदल घडवणे हा एक प्रवास असतो. ती एका वेळची घटना नाही. एमजी अगदी सुरुवातीपासून हा प्रवास अनुभवत आहे. एमजी मोटरकडून १८ ऑगस्ट रोजी सादर होणा-या ड्राइव्ह एआय इव्हेंटद्वारे आपण पुढील अपेक्षा बाळगू शकतो.

  • कार-एज-अ-प्लॅटफॉर्म सादर करणार: भविष्यातील कार आणखी स्मार्ट असतील. एमजीची पुढील कार जास्त चाणाक्ष, इंटरकनेक्टेड आणि सुविधायुक्त असेल. कार वाहने, ट्रॅफिक लाइट्स, पार्किंग बे इत्यादींसह संवाद साधेल. जेणेकरून ती एका व्यापक ‘सिस्टीम ऑफ सिस्टीम’ मध्ये सहभागी होईल.

  • डिजिटल फर्स्ट: या क्षेत्रात, कनेक्टेड कार ग्राहकांसाठी डिजिटल सेवांचा एक समूह असेल. एमजीची पुढील ऑफरिंग ही तिच्या इतर उत्पादनांपेक्षा अधिक कनेक्टेड आणि स्मार्टर असेल, अशी आशा आहे.

  • एडीएएस (ADAS) तंत्रज्ञान: एमजीने एडीएएस लेवल-१ सोबत ग्लोस्टर लाँच केली आहे. एडीएएसचा बाजारात प्रवेश झाल्यानंतर असे दिसून आले की, किंमत, ग्राहकांचे आकलन आणि सुरक्षिततेच्या समस्या या तंत्रज्ञानाच्या बाजारात वेगाने प्रवेश करण्यातील अडथळे ठरत आहेत. एमजीची पुढील कार एडीएएस सुविधेसह येईल, अशी अपेक्षा आहे.

  Comments
  Advertisement
  Advertisement
  दिनदर्शिका
  १८ शनिवार
  शनिवार, सप्टेंबर १८, २०२१

  येडीयुरप्पा यांनी कर्नाटक यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने भाजपला पळता भुई थोडी होईल, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...
  Advertisement
  Advertisement
  OK

  We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.