या अटीवर ड्रायव्हिंग करताना वापरू शकता मोबाईल; कोणती ते जाणून घ्या

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) गाडी चालवताना (driving) मोबाइल वापरण्यास परवानगी दिली आहे.

नवी दिल्ली: ड्रायव्हिंग (driving) करताना मोबाईल (mobile) वापरू नये, असा नियम आहे. मात्र आता केंद्र सरकारने यात सूट दिली आहे. तुम्ही गाडी चालवताना मोबाइलचा वापर करू शकता. मात्र त्यासाठी काही अटी देण्यात आल्या आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) शनिवारी ही माहिती दिली.

गाडी चालवताना तुम्ही मोबाईल फोन वापरू शकता मात्र फक्त रूट्स नेव्हिगेशनसाठी (Routes Navigation). शिवाय मोबाईल वापरताना ड्रायव्हिंगवरून तुमचं लक्ष विचलित होणार नाही, याचीही खबरदारी घ्या. ड्रायव्हिंग करताना फोनवर बोलत असाल तर मात्र तुम्हाला 1,000 ते 5,000 रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो, असं मंत्रालयाने सांगितलं आहे.

मंत्रालयाने म्हटलं आहे की,

करण्यात आली आहे. आता गाडीसंबंधी आवश्यक कादरपत्रं वेबपोर्टल मार्फत मेंटेन करता येतील. यामध्ये लायसन्स, रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स, फिटनेस सर्टिफिकेट, परमिट्स इत्यादींचा समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक पोर्टलमार्फत कम्पांऊंडिंग, इम्पाउंडिंग, एंडॉर्समेंट, लाइसन्सचं सस्पेंशन आणि रिव्होकेशन, रजिस्ट्रेशन, ई-चलान अशी कामंदेखील होतील.

पोर्टलवर रद्द करण्यात आलेले किंवा डिसक्वॉलिफाईड ड्रायव्हिंग लायसन्स, जप्त केलेली कागदपत्रं, मोडलेले नियम या सर्वांची नोंद ठेवली जाणार. त्यामुळे ड्रायव्हरच्या व्यवहारावर लक्ष असणार आहे. नियमांनुसार तुम्ही वाहनसंबंधी डॉक्युमेंट्स इलेक्ट्रॉनिक माध्यमातून व्हेरिफाय केले असतील तर पोलीस अधिकारी त्याची फिजिकल कॉपी मागणार नाहीत.

गेल्या वर्षी केंद्र सरकारने मोटर वाहन कायद्यात अनेक दुरूस्ती करून अनेक नियम लागू केले होते. यामध्ये परिवहन नियमांपासून रस्ते सुरक्षा याचा समावेश होता. या नियमांचं उल्लंघन झाल्यास मोठ्या दंडाची तरतूद होती. सोबतच भ्रष्टाचार कमी करण्यासाठी टेक्नॉलॉजीदेखील अपग्रेड करण्यात आली होती. आता हे सर्व नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.