हिरो एक्सट्रीम १६०आर बाईकचं नवीन लूक, जाणून घ्या…

  • हिरो मोटोकॉर्प या कंपनीने आपल्या नवीन बाईकची घोषणा केली आहे
  • हिरो मोटोकॉर्प कंपनीची ही पहिली १६०सीसी बाईक आहे
  • हिरो एक्सट्रीम १६०आर ही बाईक नवीन डायमंड फ्रेम चेसिसवर आधारित आहे

हिरो मोटोकॉर्प या कंपनीने आपल्या नवीन बाईकची घोषणा केली आहे. या बाईकचं नाव हिरो एक्सट्रीम १६०आर असं आहे. या कंपनीने आपल्या नवीन बाईकचं प्रदर्शन फेब्रुवारी महिन्यात केलं होतं. तसेच ही बाईक मार्च महिन्यात बाजारात लॉन्च करण्यात येणार होती. परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बाईकचं लॉन्चींग थांबवण्यात आले होते. 

या बाईकमध्ये पाच फिचर्स आहेत महत्त्वाचे – 

हिरो मोटोकॉर्प कंपनीची ही पहिली १६०सीसी बाईक आहे. यामध्ये ऑल-एलईडी लाईटींग आणि साईड स्टँड इंजिन कट-ऑफसारखे नवीन फिचर्स आहेत. तसेच हिरो एक्सट्रीम १६०आरमध्ये १६३सीसीचं इंजिन आहे. ज्यामध्ये ८५००आरपीएम वर १५ एचपी एवढी पॉवर आहे. त्याचप्रमाणे ही बाईक ४.७ सेकंदामध्ये ०-६० किलोमीटर इतक्या वेगाने धावू शकते. असा दावा कंपनीने केला आहे.

हिरो एक्सट्रीम १६०आर ही बाईक नवीन डायमंड फ्रेम चेसिसवर आधारित आहे. त्यामुळे या बाईकचं वजन १३८.५ किलोग्रॅम एवढं आहे. या बाईकचं सेगमेंट पाहिलं असता, सर्वात हलकी आणि शार्प लूकमध्ये दिसणारी अशी ही एक स्पोर्टी बाईक आहे.