नेक्सझू मोबिलिटीने ई-सायकल रोडलार्क लाँच केली; भारताची पहिली ई-सायकल जी एकदा चार्ज केल्यावर १०० किमी चालते

रोडलार्कमध्ये “ड्युअल बॅटरी सिस्टम” आहे. मुख्य बॅटरी ८.७ एएचची हलकी, बदलतायेण्याजोगी असून दुय्यम बॅटरी ५.२ एएचची इन-फ्रेम बॅटरी आहे, जी घरगुती सॉकेटवर चार्ज करता येते. या नवीन रोडलार्कमध्ये पेडलेक मोड वर तब्बल १०० किमी राईडिंग रेंज तर थ्रोटल मोडवर ७५ किमी रेंज आहे. सुरक्षित आणि आरामदायक रायडिंग अनुभवासाठी ही ई-बाइक ताशी २५ किमी गती देते.

    मुंबई : भारतातील स्वदेशी ई-मोबिलिटी ब्रॅंड नेक्सझू मोबिलिटीने एक नवीन मेड इन इंडिया, लॉन्ग रेंज, इलेक्ट्रिक सायकल- रोडलर्क इलेक्ट्रिक सायकल लाँच केली आहे, जी एकदा चार्ज केल्यावर १०० किमी. चालते. दरेक चार्जमध्ये १०० किमी जाणाऱ्या या सायकलमध्ये मजबूत कोल्ड रोल्ड स्टीलची फ्रेम, ऑटोमोटिव्ह ग्रेड बिल्डची गुणवत्ता आणि काढता येण्याजोगी बॅटरी आणि ड्युअल डिस्क ब्रेक्ससारखी ग्रहाकाला पसंत असलेली फीचर्स आहेत. नवीन रोडलार्क एक नाविन्यपूर्ण इनोव्हेशन आहे, जे त्याच्या वरवर दिसणार्‍या क्षमतेपेक्षा खूप अधिक कार्यक्षम आहे आणि बहुतांशी इलेक्ट्रिक आणि कित्येक पेट्रोल स्कूटर्सशी देखील स्पर्धा करण्याची क्षमता त्यामध्ये आहे. नवीन रोडलार्क तुमच्या शहरातील दैनंदिन प्रवासासाठी उत्तम असून स्कूटर्सच्या तुलनेत किंमत, रनिंग कॉस्ट आणि मेंटेनन्सच्या बाबतीत ती उजवी ठरते.

    रोडलार्कमध्ये “ड्युअल बॅटरी सिस्टम” आहे. मुख्य बॅटरी ८.७ एएचची हलकी, बदलतायेण्याजोगी असून दुय्यम बॅटरी ५.२ एएचची इन-फ्रेम बॅटरी आहे, जी घरगुती सॉकेटवर चार्ज करता येते. या नवीन रोडलार्कमध्ये पेडलेक मोड वर तब्बल १०० किमी राईडिंग रेंज तर थ्रोटल मोडवर ७५ किमी रेंज आहे. सुरक्षित आणि आरामदायक रायडिंग अनुभवासाठी ही ई-बाइक ताशी २५ किमी गती देते. यामध्ये ड्युअल व्हेंटिलेटेड डिस्क ब्रेक्स आहेत, ज्यामुळे झटकन थांबण्याची शक्ती त्यात असून सुरक्षित व आरामदायक रायडिंगसाठी मजबूत फ्रन्ट सस्पेन्शन यात आहे. या नवीन रोडलार्कची किंमत ४२ हजार रुपये असून ग्राहक नेक्सझूच्या ९०+ टच पॉईंट्समधून किंवा नेक्सझू मोबिलिटीच्या अधिकृत वेबसाइटवरून ही गाडी खरेदी करू शकतात.

    ही अत्याधुनिक रोडलार्क सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. कमी वजनाच्या आदलाबदली होऊ शकणार्‍या बॅटरीज आणि तब्बल १०० किमी राईडिंग रेंज असलेली ही नवी रोडलार्क म्हणजे मेक इन इंडियाच्या सामर्थ्याची आणि नेक्सझूच्या ग्राहककेंद्री डिझाइन आणि इंजिनियरिंगची साक्ष आहे. ही अशी इलेक्ट्रिक सायकल आहे, जी मुख्य दैनंदिन वाहतुकीचे साधन म्हणून वापरता येऊ शकते, अगदी स्कूटर्सऐवजी देखील. यामध्ये ६ वेगवेगळे राईडिंग मोड आहेत, जे चालक त्याला आवश्यक त्या इलेक्ट्रिक मदतीच्या आणि राईडिंगच्या गरजेनुसार निवडू शकतो. इलेक्ट्रिक सायकलीचे आरोग्यविषयक फायदे असतात आणि नवीन सुपर लॉन्ग रेंज रोडलार्कच्या माध्यमातून ग्राहककेंद्री, किफायतशीर आणि स्वच्छ मोबिलिटी सोल्युशन प्रस्तुत करताना आम्ही आनंद अनुभवत आहोत.

    राहुल शोनक, सीओओ, नेक्सझू मोबिलिटी