निसान इंडियाने आपल्या निसान मॅग्नाईट बुकिंग पूलमधून १०० विजेत्यांची घोषणा केली

ऑल- न्यू निसान मॅग्नाईट सध्या संपूर्ण निसान इंडियाच्या डीलरशिपवर आणि कंपनीचे संकेतस्थळ https://book.nissan.in/ वर बुकींग साठी उपलब्ध आहे. सध्या सर्व व्हेरियंटस स्पेशल इंट्रोडक्‍ट्री किंमतींवर उपलब्ध असून खरेदीप्रक्रिये दरम्यान ग्राहकांसाठी संपूर्ण डिजिटल अनुभव प्रदान करेल हे २० ग्रेड लाईन-अप्स आणि ३६ पेक्षा जास्त कॉम्बिनेशनमध्ये ५. ४९ लाख ते रुपये. ९. ७५ लाख पर्यंत उपलब्ध आहे.

  • निसान इंडियाने आपल्या व्हॅलेंटाईन प्रोग्रामच्या पहिल्या फेरीत १०० विजेत्यांची घोषणा केली

नवी दिल्ली : निसान इंडियाने आपल्या खास व्हॅलेंटाईन प्रोग्रामच्या पहिल्या फेरीत १०० विजेत्यांची घोषणा केली. कंपनीने आपल्या या प्रोग्रामची सुरुवात त्या सर्व ग्राहकांचे आभार मानण्यासाठी केली आहे जे आपल्या बिग, बोल्ड, ब्युटीफुल आणि ‘कॅरिझमॅटिक’ एसयूव्ही – ऑल- न्यू-निसान मॅग्नाईटची आतुरतेने वाट पाहत आहेत.

गाझियाबाद स्थित यूवी निसान डीलरशिपकडून श्री. सौरभ भट्टाचार्य यांनी आपल्या नवीन निसान मॅग्नाईटवर १००% कॅशबॅक जिंकला आहे. तर अन्य ८ ग्राहकांनी एका व्हेरियंटचे कॉम्प्लिमेंटरी अपग्रेड जिंकले आहे . हे आठ ग्राहक पुढील प्रमाणे-आष्टा येथील (एमपी) प्रेमसिंग हरिवंशी, बरेलीचे श्री.रमणसिंग, औरंगाबादचे श्री गणेश डोईफोडे, मोहालीचे श्री. बसंतकुमार बन्सल, बंगलोरचे श्री. गोकुळनाथ जयकुमार, रंगरेड्डीचे (तेलंगणाचे) मोहसिन शरीफ, हैदराबादहून अहमद शायक आणि पश्चिम गोदावरी येथील श्री मंदा ब्राह्मानंद राव. उर्वरित विजेत्यांची नावे निसान इंडिया वेबसाइट www.nissan.in/valentines-program वर सूचीबद्ध आहेत.

नवीन-निसान मॅग्नाईटच्या १०० प्रतिक्षित ग्राहकांना पुढच्या काही महिन्यांपर्यंत दर महिन्याला काही ना काही जिंकण्याची संधी मिळेल. ज्यांचा समावेश खालील प्रमाणे ;

ग्राहक

काय जिंकणार

१ ग्राहक एक्स-शोरूम किंमती वर १०० % कॅशबॅक
८ ग्राहक एका व्हेरियंटचे अपग्रेड
२५ ग्राहक १ वर्षाची वाढीव वॉरन्टी
६६ ग्राहक २ वर्षे/ २० हजार किलोमीटर मेंटेनन्स पॅकेज

ऑल- न्यू- निसान मॅग्नाईटला जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून ग्राहक आमची बिग, बोल्ड, ब्युटीफुल आणि 'कॅरिझमॅटिक' एसयूव्ही चालविण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. व्हॅलेंटाईन प्रोग्रामच्या सर्व १०० विजेत्यांचे अभिनंदन करत आहोत ज्यांना त्यांच्या प्रतिक्षेचे चांगले फळ मिळाले आहे. निसान इंडियाने आपल्या ग्राहकांचा प्रतिक्षा कालावधी कमी करण्यासाठी सेमी-कंडक्टर उपलब्धता इत्यादी पुरवठ्यावरील आव्हानांना तोंड देण्याच्या दिशेने काम करत असताना, आपल्या प्रकल्पात १००० पेक्षा अधिक नवीन कर्मचाऱ्यांना भरती करून तिसरी शिफ्ट सुरु केली. निसानच्या डीलर्सनी सुद्धा ग्राहकांचा ग्राहकांचा अनुभव सर्वोत्तम व्हावा म्हणून त्यांच्या नेटवर्कमध्ये ५०० पेक्षा जास्त नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली आहे.

राकेश श्रीवास्तव, व्यवस्थापकीय संचालक, निसान मोटर इंडिया

ऑल- न्यू निसान मॅग्नाईट सध्या संपूर्ण निसान इंडियाच्या डीलरशिपवर आणि कंपनीचे संकेतस्थळ https://book.nissan.in/ वर बुकींग साठी उपलब्ध आहे. सध्या सर्व व्हेरियंटस स्पेशल इंट्रोडक्‍ट्री किंमतींवर उपलब्ध असून खरेदीप्रक्रिये दरम्यान ग्राहकांसाठी संपूर्ण डिजिटल अनुभव प्रदान करेल हे २० ग्रेड लाईन-अप्स आणि ३६ पेक्षा जास्त कॉम्बिनेशनमध्ये ५. ४९ लाख ते रुपये. ९. ७५ लाख पर्यंत उपलब्ध आहे आणि प्रत्येक ग्रेड वॉकला काळजीपूर्वक क्युरेट केलेले आहे जेणेकरून खासकरून भारतीय ग्राहकांच्या आकांक्षा पूर्ण करू शकेल.