निस्सान इंडियातर्फे निस्सान मॅग्नाइटच्या ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण व्हर्च्युअल विक्री सल्लागार सेवा लाँच

व्हर्च्युअल विक्री सल्लागारातर्फे (Virtual Sales Consultant) निस्सान ग्राहकांना उत्पादनाविषयी रियल- टाइम (Real Time), वैयक्तिक गरजेनुसार आणि तज्ज्ञ सल्ला (Expert Advice) पुरवला जाईल. त्यात वाहनाची सर्व माहिती, उत्पादन व खरेदीविषयी शंकांचे निरसन, उत्पादनाचे व्हेरिएंट्स, वित्तसहाय्य आणि एक्सचेंज मूल्याचे पर्याय, व्हर्च्युअल टेस्ट ड्राइव्ह तसेच कारची ऑनलाइन नोंदणी (Car Online Registration) यांचा समावेश असेल.

  • हा संवादी व्हर्च्युअल विक्री सल्लागार या क्षेत्रातील पहिलाच उपक्रम निस्सान इंडियाच्या डिजिटल कार खरेदी प्लॅटफॉर्मवर
  • ग्राहकाच्या कार खरेदी प्रवासात या सेवेमुळे तज्ज्ञांकडून कारविषयी माहितीपूर्ण मार्गदर्शन मिळणार

नवी दिल्ली : निस्सान इंडियाने (Nissan India) या क्षेत्रातील पहिलीच नाविन्यपूर्ण व्हर्च्युअल विक्री सल्लागार (सेल्स अडव्हायजर) सेवा निस्सान मॅग्नाइटच्या (Nissan Magnite) ग्राहकांसाठी लाँच (Launch) केली आहे. कंपनीच्या Shop@home या डिजिटल प्लॅटफॉर्मचा एक भाग म्हणून लाँच करण्यात आलेली ही सेवा एक्सेन्ट्रिक इंजिनच्या (Accentric engine) सहकार्याने ग्राहकांचा खरेदीचा अनुभव उंचावण्यासाठी दिली जाणार आहे.

व्हर्च्युअल विक्री सल्लागारातर्फे (Virtual Sales Consultant) निस्सान ग्राहकांना उत्पादनाविषयी रियल- टाइम (Real Time), वैयक्तिक गरजेनुसार आणि तज्ज्ञ सल्ला (Expert Advice) पुरवला जाईल. त्यात वाहनाची सर्व माहिती, उत्पादन व खरेदीविषयी शंकांचे निरसन, उत्पादनाचे व्हेरिएंट्स, वित्तसहाय्य आणि एक्सचेंज मूल्याचे पर्याय, व्हर्च्युअल टेस्ट ड्राइव्ह तसेच कारची ऑनलाइन नोंदणी (Car Online Registration) यांचा समावेश असेल. या प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहकाला माहिती व व्यवहाराशी संबंधित संपूर्ण सहकार्य आणि पर्यायाने विचारपूर्वक खरेदीचा निर्णय घेण्यास मदत केली जाईल.

‘महामारीमुळे ग्राहक संवादाचे पारंपरिक मार्ग बदलले आहेत. बाजारपेठेतील समीकरणे बदलवणाऱ्या निस्सान मॅग्नाइट या गाडीच्या लाँचवेळेस निस्सानने नाविन्यपूर्ण व्हर्च्युअल शोरूम व्हर्च्युअल टेस्ट ड्राइव्ह लाँच केली होती. व्हर्च्युअल विक्री सल्लागार सेवेमुळे खरेदीचा पारदर्शक, लवचिक आणि सोयीस्कर अनुभव मिळेलच, शिवाय तज्ज्ञ ऑनलाइन सल्लागारामुळे वाहन खरेदीचा अनुभव अधिक समृद्ध होईल,’ असे निस्सान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव म्हणाले.

लाँचपासून निस्सान मॅग्नाइटसाठी ३ लाख जणांनी चौकशी केली आहे, तर ६०००० बुकिंग्ज मिळाले आहेत. यापैकी २५ टक्के बुकिंग Shop@Home च्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. यावरून कार खरेदी करण्याच्या प्रक्रियेत ग्राहकांच्या अपेक्षा बदलत असून ते डिजिटल माध्यमाला पसंती देत असल्याचे नव्याने अधोरेखित झाले आहे. निस्सान मॅग्नाइट लाँच होण्याआधीच व्हर्च्युअल शोरूम लाँच करण्यापासून या क्षेत्रात पहिल्यांदाच व्हर्च्युअल टेस्ट ड्राइव्ह देण्यानंतर व्हर्च्युअल विक्री सल्लागार हे डिजिटल ग्राहकाच्या बदलत्या स्वरुपाचे पुढचे पाऊल आहे.

एक्सेन्ट्रिक इंजिनचे सह- संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वरुण शहा म्हणाले, ‘कॉन्सियर्ज या आमच्या नव्या उत्पादनासह निस्सान इंडियासाठी थ्रीडी अनेबल्ड लाइव्हस्ट्रीम कॉमर्सचा अनुभव उपलब्ध करून आम्हाला आनंद होत आहे. हा अशाप्रकारचा पहिलाच डिजिटल प्लॅटफॉर्म असून त्याला त्याला पहिल्यांदाच जगातील एखाद्या वाहन उत्पादक कंपनीने मूळ अंतर्भूत अनुभवाची जोड दिली आहे. यातून वाहन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण रिटेल शक्यतांना प्रोत्साहन मिळेल. निस्सान मॅग्नाइटवर थ्रीडी कॉनफिगरेटर आणि थ्रीडी कॉमर्स प्लॅटफॉर्म्सची यशस्वी निर्मिती केल्यानंतर कॉन्सियर्ज हे आमच्या विस्तारत्या भागिदारीचे प्रतीक असून त्यातून रियल- टाइममध्ये वाहन खरेदी करण्याची प्रक्रिया अधिक जलद व मानवी स्पर्श असलेली होईल.’

ग्राहकांना या प्लॅटफॉर्मवर आपला मित्रपरिवार आणि कुटुंबियांना रियल टाइम सेशन्समध्ये आमंत्रित करता येईल व घरबसल्या निस्सान मॅग्नाइटविषयी अधिक माहिती जाणून घेता येईल. ग्राहकांना सेशनच्या शेवटी निस्सान मॅग्नाइटचे खास त्यांच्यासाठी तयार केलेले माहितीपुस्तकही मिळेल.