निस्सान इंडियाने ऑगस्ट २०२१ मध्ये गाठला ३२०९ गाड्यांच्या होलसेल विक्रीचा टप्पा

नव्या निस्सान मॅग्नाईटला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. फक्त ३० पैसे/किमी. (५०००० किमी. साठी) इतका कमी आणि आजवरचा सर्वोत्कृष्ट देखभालीचा दर या गाडीला असल्याने ६०००० अधिक बुकिंग्स झाल्या. शिवाय यात २ वर्षांची वॉरंटी (५०००० किमी.) आहे आणि ती अगदी नाममात्र दरात ५ वर्षांपर्यंत (१००००० किमी.) वाढवता येते. त्यामुळे ग्राहकांना मन:शांतीही लाभते.

  • ऑगस्ट २०२१ मध्ये निस्साने देशांतर्गत होलसेल विक्रीत ३२०९ गाड्यांचा टप्पा गाठला
  • निस्सान मॅग्नाईटने ६०००० हून अधिक बुकिंग्स मिळवल्या
  • निस्सानने देशभरात १८ नवीन ठिकाणी १८ नवे सर्विस वर्कशॉप्स सुरू केले

नवी दिल्ली : निस्सान इंडियाने संपूर्णपणे नवी निस्सान मॅग्नाईट सादर केल्याने ऑगस्ट २०२१ मध्ये ३२०९ गाड्यांच्या होलसेल विक्रीचा टप्पा गाठल्याची घोषणा केली. निस्सान आणि डॅटसून रेंजची देशांतर्गत होलसेल विक्री ३२०९ युनिट्स होती. ऑगस्ट २०२० मधील ८१० युनिट्सच्या तुलनेत २९६ टक्के वृद्धी झाली आहे.

“सध्याच्या सणासुदीच्या काळाला सुरुवात झाल्याने ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद आहे, त्यामुळे बुकिंग्सचे प्रमाण वाढले आहे. मात्र, सेमी-कंडक्टर्सच्या पुरवठ्यातील घट आणि त्यातील वाढता लीड टाईम यामुळे गाड्या उपलब्ध होण्यावर परिणाम होत आहे. यामुळे पुरवठ्यात अडचणी येत आहेत. मात्र, येत्या काही महिन्यात हे आव्हान कायम राहील याचा अंदाज आम्ही आधीच बांधला आणि त्याचवेळी ग्राहकांना अधिकाधिक संख्येने निस्सान मॅग्नाईट पुरवण्यासाठी पुरवठा साखळीवर सातत्याने काम करत आहोत. त्यामुळे ग्राहकांना लवकरात लवकर ही नव्या स्वरुपातील एसयुव्ही अनुभवता येईल. त्याचप्रमाणे क्षमता आणि कार्यक्षमता वाढवून आमच्या नेटवर्कला बळकटी देत ग्राहकानुभवावर आम्ही भर देत आहोत,” असे निस्सान मोटर इंडिया लि.चे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव म्हणाले.

नुकत्याच सादर झालेल्या नव्या निस्सान मॅग्नाईटला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. फक्त ३० पैसे/किमी. (५०००० किमी. साठी) इतका कमी आणि आजवरचा सर्वोत्कृष्ट देखभालीचा दर या गाडीला असल्याने ६०००० अधिक बुकिंग्स झाल्या. शिवाय यात २ वर्षांची वॉरंटी (५०००० किमी.) आहे आणि ती अगदी नाममात्र दरात ५ वर्षांपर्यंत (१००००० किमी.) वाढवता येते. त्यामुळे ग्राहकांना मन:शांतीही लाभते. निस्सान ग्राहकांना Nissan Service Hub किंवा Nissan Connectच्या माध्यमातून सर्विस बुक करता येते शिवाय ऑनलाइनच खर्चही जाणून घेता येतो. त्यामुळे १५०० हून अधिक शहरांमध्ये उपलब्ध निस्सानच्या २४/७ रोडसाइड असिस्टंसच्या प्रक्रियेत पारदर्शकता जपली जाते.

त्याचप्रमाणे, निस्सानच्या सर्विस नेटवर्कमध्ये निस्सान कॉस्ट कॅलक्युलेटर, निस्सान ‘बुक अ सर्विस’ आणि निस्सान ‘पिक-अप ॲण्ड ड्रॉप-ऑफ’ अशा सेवाही उपलब्ध आहेत. ‘निस्सान रोडसाइड असिस्टंस’ २९ राज्यांमध्ये आणि १५००० हून अधिक शहरांमध्ये २४*७ बहुभाषिक कॉल सेंटर्सच्या माध्यमातून ग्राहकांना साह्य करत आहे.

आपल्या ग्राहकांचे आरोग्य आणि सुरक्षेला केंद्रस्थानी ठेवत निस्सान डीलरशीपमध्ये निस्सान आणि डॅटसून कार्ससाठी ‘डोअरस्टेप सेवेची सुविधा’ आणि ‘पिक आणि ड्रॉप ऑफ’सेवाही उपलब्ध आहेत. त्यामुळे जंतूसंसर्गाचा धोका कमी होतो शिवाय ग्राहकांच्या वेळापत्रकातही फारशी ढवळाढवळ केली जात नाही. तर, ‘निस्सान एक्स्प्रेस सर्विस’मध्ये फक्त ९० मिनिटांमध्ये जलद आणि सर्वसमावेशक सेवानुभव दिला जातो.

याव्यतिरिक्त, निस्सानच्या Shop@Home मुळे ग्राहकांना देशात विक्रीसाठी उपलब्ध कोणतीही निस्सान गाडी व्हर्च्युअल शोरूममध्ये अनुभवता येते आणि व्हर्च्युअली टेस्ट ड्राइव्ह घेता येते. त्याचप्रमाणे कार बुक करण्याआधी कार पर्सनलाइज करणे, सध्याच्या गाडीची एक्सचेंज किंमत तपासणे, त्याची मोजदाद करणे, ईएमआयची तुलना करून पाहणे आणि कर्जासाठी अर्ज करणे अशा विविध सेवा पुरवल्या जातात. निस्सानच्या Shop@Home मध्ये तुम्हाला घरबसल्या अगदी सोयीस्कर पद्धतीने पारदर्शक आणि वापरकर्तास्नेही पद्धतीने एंड-टू-एंड कार डिजिटल ग्राहकसेवा पुरवली जाते.