Nissan Indias big attractive beautiful and charismatic SUV The Nissan Magnite arrives vb
निस्सान इंडियाची मोठी, आकर्षक, सुंदर आणि 'करिस्मॅटिक' एसयुव्ही- द निस्सान मॅग्नाईट आली

यात एक्स-ट्रॉनिक सीव्हीटी, क्रूझ कंट्रोल, ३६०-अंशातील अराऊंड व्ह्यू मॉनिटर आणि निस्सान कनेक्ट या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. चोखंदळ भारतीय ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशाने नव्या निस्सान मॅग्नाइटमधील प्रत्येक ग्रेड अत्यंत काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक तयार करण्यात आल्या आहेत.

  • भारतभरात डीलरशीप आणि वेबसाइट्सवर आजपासून बुकिंगला सुरुवात
  • खास सादरीकरणाची किंमत सुरू होत आहे रु. 4,99,000 (एक्स-शोरूम) रुपयांपासून
  • खास सादरकरणाची ऑफर ३१ डिसेंबर २०२० पर्यंत लागू
  • या क्षेत्रात पहिल्यांच वेबसाइटवर व्हर्च्युअल टेस्ट ड्राइव्हही उपलब्ध

नवी दिल्ली : निस्सान इंडियाने त्यांच्या नव्या निस्सान मॅग्नाईटच्या किमती जाहीर केल्या आहेत आणि देशभरातील निस्सान डीलरशीप तसेच https://book.nissan.in/ या त्यांच्या वेबसाइटवर बुकिंग सुरू झाल्याचीही घोषणा केली. ही मोठी, आकर्षक, सुंदर आणि ‘करिस्मॅटिक’ एसयूव्ही ३१ डिसेंबर २०२० पर्यंत रु. 4,99,000 (एक्स-शोरूम) या खास सादरीकरणाच्या किमतीत उपलब्ध आहे.

नवी निस्सान मॅग्नाइट म्हणजे भारत आणि जागतिक बाजारपेठेसाठीच्या निस्सान नेक्स्ट धोरणातील एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ म्हणजेच जगासाठी भारतात निर्मिती करण्याचे ध्येय बाळगून नवी निस्सान मॅग्नाईट सादर आहे या वर्गातील अभूतपूर्व आणि सर्वोत्कृट अशा २० वैशिष्ट्यांसह. यामुळे ग्राहकांना ही गाडी बाळगण्याचा अत्यंत अनोखा, नाविन्यपूर्ण आणि सहजसुंदर अनुभव मिळेल,” असे निस्सान मोटर इंडियाचे अध्यक्ष सिनान ओझकोक म्हणाले.

समृद्ध करणारा अनुभव देण्यासाठी सातत्याने नाविन्यावर भर देण्याच्या निस्सानच्या तत्वाला अनुसरून निस्सानचे ख्यातनाम तंत्रज्ञान त्यांच्या सर्व मॉडेल रेंजमध्ये उपलब्ध आहे. यात एक्स-ट्रॉनिक सीव्हीटी, क्रूझ कंट्रोल, ३६०-अंशातील अराऊंड व्ह्यू मॉनिटर आणि निस्सान कनेक्ट या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. चोखंदळ भारतीय ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशाने नव्या निस्सान मॅग्नाइटमधील प्रत्येक ग्रेड अत्यंत काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक तयार करण्यात आल्या आहेत.

तंत्रज्ञानस्नेही भारतीय ग्राहकासाठी निस्सानच्या पर्यायी ‘टेक पॅक’मध्ये वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर, एम्बियंट मूड लायटिंग, पडल लॅम्प्स आणि हाय एंड स्पीकर्सचा समावेश आहे.

निस्सान इंडियाने आज या क्षेत्रातील पहिलीच टेस्ट ड्राइव्ह सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यात ग्राहकांना कुठेही त्यांच्या वैयक्तिक डिव्हाइसवरून नव्या निस्सान मॅग्नाईटचा अनुभव घेता येईल. गाडी चालवण्याच्या या अनोख्या अनुभवामुळे निस्सान ग्राहकांना व्हर्च्युअल सेल्स कन्सलटंटसोबत नवी ‘करिस्मॅटिक’ एसयूव्ही चालवण्याची अनोखी संधी मिळते.

नवी निस्सान मॅग्नाईट सादर केल्याने निस्सानने भारतीय बाजारपेठेतील आपल्या ग्राहककेंद्री प्रवासातील एक संस्मरणीय टप्पा गाठला आहे. खासकरून आमच्या चोखंदळ भारतीय ग्राहकांसाठी आम्ही मोठी, आकर्षक, सुंदर आणि 'करिस्मॅटिक' एसयूव्ही खास सादरीकरणाच्या किमतीत उपलब्ध करून देत आहोत. तंत्रज्ञान आणि महत्त्वाकांक्षेत अत्यंत वरचा दर्जा गाठणारी नवी निस्सान मॅग्नाईट नवे मापदंड स्थापित करेल, असा आम्हाला विश्वास आहे

राकेश श्रीवास्तव, व्यवस्थापकीय संचालक. निस्सान मोटर इंडिया