Nissan तर्फे निसान मॅग्नाइट कन्सेप्टचे इंटिरियर्स सादर

निसान इंडियाने निसान मॅग्नाइट कन्सेप्टच्या अंतर्गत रचनेची (इंटिरियर) छायाचित्रे नुकतीच प्रसिद्ध केली.

नवी दिल्ली : निसान इंडियाने निसान मॅग्नाइट कन्सेप्टच्या अंतर्गत रचनेची (इंटिरियर) छायाचित्रे नुकतीच प्रसिद्ध केली. गेल्या महिन्यात जागतिक पातळीवर मांडण्यात आलेल्या या गाडीच्या अंतर्गत रचनेत डॅशबोर्ड आणि केबिनस्पेस यांना विशेष अधोरेखित करण्यात आले आहे.

निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव म्हणाले, “निसान मॅग्नाइट कन्सेप्ट ही निसानच्या एसयूव्हीच्या इतिहासातली एक उत्क्रांतीकारक झेप आहे. तिच्या केवळ बहिर्भागातच नव्हे, तर अंतर्भागातही शाही डौल, उच्च अभिरूची आणि प्रशस्तपणाचे दर्शन घडते. डिझाइन तत्त्वज्ञानाच्या गाभ्यातील ही तत्त्वे सध्या निर्मिती अवस्थेत असलेल्या प्रॉडक्शन मॉडेलमध्येही याचे प्रतिबिंब उमटेल आणि या वाहनातील उच्चतम तंत्रज्ञानाच्या साथीमुळे या सेग्मेंटमध्ये ही गाडी गेमचेंजर ठरू शकेल.”

निसानच्या एसयुव्ही परंपरेच्या आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारावर उभारण्यात येत असलेल्या निसान मॅग्निट्यूड कन्सेप्टची रचना भविष्यातील प्रवासाच्या दृष्टीने करण्यात आलेली असून स्टायलिश डिझाइनची शाही सवारी ही तिची ओळख असेल. अंनिसान इंडियाने निसान मॅग्नाइट कन्सेप्टच्या अंतर्गत रचनेची (इंटिरियर) छायाचित्रे नुकतीच प्रसिद्ध केली.तर्बाह्य आलिशान असलेल्या या एसयूव्हीमध्ये ग्राहकाच्या जीवनशैलीचे प्रतिबिंब उमटेल.