आता बोंबला : उद्यापासून होणार नाही फास्टॅग वाहनाचे रजिस्ट्रेशन, जाणून घ्या RTO चे नवे नियम

राष्ट्रीय महामार्गाच्या टोलनाक्यावर फास्टॅग नसलेल्या वाहनांना टोल टॅक्समधून सूट मिळणार नाही. नव्या नियमांनुसार जर २४ तासांत वाहन चालक पुन्हा याच मार्गाने येणार असेल आणि वाहनावर फास्टॅग लावलेला असेल तरच टोल टॅक्समधून ५० टक्के सूट मिळणार आहे.

लखनऊ : १ जानेवारीपासून टोल नाक्यांवरून ये-जा करणाऱ्या चारचाकी वाहनांवर फास्टॅग अनिवार्य असणार आहे. अशातच फास्टॅग नसलेल्या वाहनांचे रजिस्ट्रेशन २५ डिसेंबरपर्यंत होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. यासंबंधी रस्ते वाहतूक विभागाने विक्रेत्यांसाठी बुधवारी नियमावली जारी केली आहे.

रस्ते वाहतूक विभागाच्या रामफेर द्विवेदी यांच्या मते, सर्व चारचाकी वाहनांना फास्टॅग अनिवार्य असणार आहे. सोबतच तपासणी दलाकडून चालकांना फास्टॅग लावण्यासंबंधी मार्गदर्शनही करतील. लखनऊ वाहतूक विभाग कार्यालयात विविध प्रकारच्या चारचाकी नोंदणीकृत वाहनांची संख्या सहा लाखांहून अधिक आहे. यापैकी जवळपास सव्वा लाख वाहने रस्त्यांवर येतच नाहीत. दुसरीकडे दीड लाख व्यावसायिक वाहने असून तीन लाखाहून अधिक खासगी वाहने नोंदणीकृत आहेत. त्यापैकी २५ टक्के वाहनांवरच फास्टॅग लावलेले असल्याचं द्विवेदी यांनी सांगितलं.

फास्टॅग नसलेल्या वाहनांची टोल टॅक्समधून सुटका नाही

राष्ट्रीय महामार्गाच्या टोलनाक्यावर फास्टॅग नसलेल्या वाहनांना टोल टॅक्समधून सूट मिळणार नाही. नव्या नियमांनुसार जर २४ तासांत वाहन चालक पुन्हा याच मार्गाने येणार असेल आणि वाहनावर फास्टॅग लावलेला असेल तरच टोल टॅक्समधून ५० टक्के सूट मिळणार आहे. म्हणजेच एका बाजूचा टोल टॅक्स माफ होणार आहे.

एनएचएआयचे प्रकल्प संचालक एनएन गिरी यांनी सांगितले की, वाहन मालकांना फास्टॅग प्रणालीकडे आकर्षित करण्यासाठी हा उपाय अवलंबिण्यात आला आहे. यामागची कल्पना म्हणजे डिजिटल कॅशलेस सिस्टम पूर्णपणे अंमलात आणणे. १ जानेवारीपासून केंद्र सरकारने सर्व वाहनांवर फास्टॅग अनिवार्य केले आहे. हेदेखील हे लक्षात घेण्यासारखे आहे. सध्या लखनऊमध्ये निगोहन आणि इटौंजा टोल प्लाझा येथे प्रत्येकी एक कॅश लेन आहे. वाहनधारक www.fastag.org या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात असंही गिरी म्हणाले.