लवकरच येतोय Mahindra Tharचा नवीन आविष्कार, असणार आहेत ५ डोअर्स; कधी होणार लाँच? क्लिक करा आणि वाचा

Mahindra Thar खरेदीचे अधिकाधिक ग्राहकांचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी या कारचे नवीन बेस व्हेरियंट आणणार आहे. कंपनी या कारला लोव्हर कॅपिसिटी इंजिनसोबत बाजारात आणणार आहे. त्यानंतर याच कारचे ५ डोअर व्हर्जन लाँच केले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

  मुंबई : महिंद्रा कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२६ पर्यंत महिंद्रा ९ नवीन कार्स किंवा कार्सचे नवीन व्हर्जन बाजारात सादर करणार आहे. यामध्ये महिंद्रा थार या कारच्या ५ डोअर व्हर्जनचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. महिंद्रा कंपनीकडून या माहितीला दुजोरा देण्यात आला आहे.

  कधी होणार लाँच?

  Mahindra Thar खरेदीचे अधिकाधिक ग्राहकांचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी या कारचे नवीन बेस व्हेरियंट आणणार आहे. कंपनी या कारला लोव्हर कॅपिसिटी इंजिनसोबत बाजारात आणणार आहे. त्यानंतर याच कारचे ५ डोअर व्हर्जन लाँच केले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

  महिंद्रा थार या कारला Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये ४ स्टार रेटिंग मिळाली आहे. या व्यतिरिक्त कार साइड इंपॅक्ट क्रॅश टेस्टमध्ये देखील पास झाली. महिंद्रा थारला चाइल्ड प्रोटेक्शन रेटिंगमध्ये ४ स्टार मिळाले आहेत.

  मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गियरबॉक्स पर्याय

  Mahindra थारच्या या बेस व्हेरियंटमध्ये १.५ लीटर, ३ सिलेंडर इंजिन असण्याची शक्यता आहे, ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गियरबॉक्स पर्यायासोबत येईल. कार ४ व्हिल ड्राइव्हसोबत येणार नाही. कारमध्ये रियर व्हिल ड्राइव्ह सिस्टम मिळेल, असे सांगितले जात आहे.

  now Coming soon Mahindra Thars new invention there will be 5 doors suv confirmed When will the launch take place Click and read