OLA चा मोठा निर्णय; उंचावणार भारताची शान, १० हजार महिला बनवणार ई-स्कूटर; ठरणार जगातील सर्वात मोठा कारखाना

महिलांचा अशाप्रकारे नोकरी देऊन महिलांचा सन्मान करत भारतीय कंपनी जगतात ओलाचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदविले जाईल आणि भारताची शानही वाढेल अशी १ नंबर कामगिरी कंपनीच्या व्यवस्थापनाने केली आहे.

    नवी दिल्ली : देशात ई-स्कूटर्सची (e scooter) मागणी दिवसेंदिवस वाढत (demand increase) आहे. अनेक कंपन्यांनी ई-स्कूटर्स बाजारात आणल्या आहेत. त्यात ‘ओला’ (OLA) ने एक मोठे पाऊल उचलले आहे. कंपनीचा जगातील सर्वात माठा ई-स्कूटर उत्पादनाचा कारखाना भारतात राहणार ((e scooter production company in India) असून तो केवळ महिलाच चालविणार आहेत (run by womens only). कंपनीचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

    महिलांचा अशाप्रकारे नोकरी देऊन महिलांचा सन्मान करत भारतीय कंपनी जगतात ओलाचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदविले जाईल आणि भारताची शानही वाढेल अशी १ नंबर कामगिरी कंपनीच्या व्यवस्थापनाने केली आहे.

    ‘ओला’ने नुकतीच ई-स्कूटर सादर केली होती. त्याच्या ऑनलाईन बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला होता. कंपनीचा तामिळनाडूमध्ये सर्वात मोठा कारखाना असून तो केवळ महिलाच चालविणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. या ठिकाणी १० हजारांहून अधिक महिला काम करणार आहेत. त्यापैकी पहिल्या तुकडीचे अग्रवाल यांनी एक व्हिडिओ शेअर करून स्वागत केले.