Okinawa halted production of e scooters with lead acid battery packs nrvb
ओकिनावाकडून लीड-ॲसिड बॅटरी पॅक असलेल्या ई-स्कूटर्सचे उत्पादन थांबवण्यात आले

स्थापनेपासून ओकिनावाने भारतात लीड ॲसिड आधारित उत्पादनांचे ३४,००० हून अधिक युनिट्सची विक्री केली आहे. एकूण ब्रॅण्डने ७४,५०० हून अधिक युनिट्सची विक्री केली आहे आणि ब्रॅण्डची आर्थिक वर्षाअखेर जवळपास ९०,००० युनिट्सच्या विक्रीचा टप्‍पा गाठण्याची योजना आहे.

मुंबई : ओकिनावा या ‘मेक इन इंडिया’वर फोकस असलेल्या आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादन करणा-या कंपनीने त्यांच्या लीड-ॲसिड उत्पादनांचे निर्माण थांबवले आहे. ब्रॅण्ड आता फक्त लिथियम-आयन व्हर्जन्सवर लक्ष केंद्रित करणार आहे. स्टार्टअप कंपनीने लीड-ॲसिड स्कूटर ओकिनावा रिजसह त्यांचा प्रवास सुरू केला आणि ३ वर्षांच्या कालावधीमध्ये ४ लीड ॲसिड स्कूटर्स सादर केल्या. हळूहळू ब्रॅण्डने लिथियम-आयन डिटॅचेबल बॅटरी असलेल्या ई-स्कूटर व्हर्जन्स सादर केल्या. उत्तम तंत्रज्ञानामुळे या व्हर्जन्सना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या व्हर्जन्स युजर्ससाठी चार्जिंग समस्येचे देखील निराकरण करतात.

स्थापनेपासून ओकिनावाने भारतात लीड ॲसिड आधारित उत्पादनांचे ३४,००० हून अधिक युनिट्सची विक्री केली आहे. एकूण ब्रॅण्डने ७४,५०० हून अधिक युनिट्सची विक्री केली आहे आणि ब्रॅण्डची आर्थिक वर्षाअखेर जवळपास ९०,००० युनिट्सच्या विक्रीचा टप्‍पा गाठण्याची योजना आहे.

आम्‍ही १०० टक्के लिथियम-आयन बॅटरी पॅक आधारित दुचाकींमध्ये बदलत आहोत. आम्ही ब्रॅण्ड सादर केला तेव्हा लीड ॲसिड बाजारपेठेमध्ये उपलब्ध सर्वात प्रगत पर्याय होता. आता उद्योग व ब्रॅण्डच्या प्रखर विकासासह आम्ही पुढाकार घेतला आहे आणि लीड-ॲसिड बॅटरी पॅक आधारित उत्पादनांचे निर्माण थांबवले आहे. ओकिनावा उत्पादने लिथियम-आयन बॅटरी पॅक्सने सक्षम व कार्यक्षम असण्यासह डि‍टॅचेबल बॅटऱ्या देखील असतील ज्यामधून युजर्सना उत्तम सोयीसुविधांची खात्री मिळेल.

जीतेंदर शर्मा, व्यवस्थापकीय संचालक व संस्थापक, ओकिनावा