ओलानंच केलं गं बया अन् पेट्रोलंच मार्केटचं पार वाटोळं झालं ग बया , सेकंदाला ४ बाइक्सचं बुकिंग, पहिल्या २४ तासांतला आकडा ऐकूनच बसेल धक्का

भारतीय इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Vehicles) पसंती देत आहे तर पेट्रोल वाहनांना (Petrol Vehicles) नाकारत आहेत! आम्ही प्रति सेकंद ४ स्कूटर विकल्या आणि एका दिवसात ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या स्कूटरचा बिझनेस (Scooters Sale) झाल्याचे त्यांनी सांगितले.

    नवी दिल्ली : देशभरात सध्या ओला इलेक्ट्रिक बाइकने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. ओला एस1 स्कूटर या मॉडेलच्या तब्बल सहाशे कोटींच्या बाइक्स विकल्या गेल्याची माहिती ओला इलेक्ट्रिकने (Ola Electric scooter) दिली आहे .

    ज्या ग्राहकांनी सर्वप्रथम बाइकचे बुकिंग (bike Booking) केले आहे. त्यांना वितरण करण्याचे काम कंपनीकडून करण्यात येत आहे. ओलाने असा दावा केला आहे की, 24 तासांमध्ये दर सेकंदाला 4 स्कूटर (Ola Electric scooter) विकल्या जात आहेत.

    ओलाचे सीईओ भावीश अग्रवाल (Bhavish Aggarwal) यांनी ट्विट करून कंपनीच्या या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, भारतीय इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Vehicles) पसंती देत आहे तर पेट्रोल वाहनांना (Petrol Vehicles) नाकारत आहेत! आम्ही प्रति सेकंद ४ स्कूटर विकल्या आणि एका दिवसात 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या स्कूटरचा बिझनेस (Scooters Sale) झाल्याचे त्यांनी सांगितले.

    ग्राहकांना ओला एस1 आणि एस1 प्रो खरेदी करण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. ज्या लोकांनी या बाइकचे बुकिंग केले आहे त्याची खरेदी प्रक्रिया आजपासून सूरू होणार असल्याचे सीईओ म्हणाले. ज्यावेळी या बाइकची विक्री थांबेल त्यानंतर पुन्हा बुकिंगला सुरूवात होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. याचबरोबर ओला बाइकचे बुकिंग फक्त त्यांच्या अधिकृत ॲपवर करता येणार आहे.