जुलैमध्ये रस्त्यांवर धावणार Ola ची ई-स्कूटर, 18 मिनिटांत होणार 50 टक्के चार्ज

याच्या अंतर्गत 400 शहरांमध्ये एक लाख चार्जिंग पॉईंट उभारण्यात येणार आहेत. पहिल्या वर्षात ओला देशातील 100 शहरांमध्ये 5,000 चार्जिंग पॉईंट उभारेल. हे देशातील चार्जिंग व्यवस्थेच्या दुप्पट आहे. ओलाची स्कूटर 18 मिनिटांत 50 टक्के चार्ज होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

    नवी दिल्ली : ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) ने यावर्षी जुलैपर्यंत भारतीय बाजारात (Indian Market) इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) आणणार असल्याची घोषणा केली आहे. याशिवाय कंपनी ‘हाइपरचार्जर’ नेटवर्क (Hypercharger Network) वर काम करत आहे ज्या अंतर्गत देशातील 400 शहरांमध्ये (400 City) एक लाख चार्जिंग पॉईंट (1 Lacs Charging Points) उभारण्यात येणार आहे. ओलाने गेल्याचवर्षी तामिळनाडूत (Tamil Nadu) पहिला इलेक्ट्रिक स्कूटर कारखाना (1st Electric Scooter Factory) उभारण्यासाठी 2,400 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली होती. हा कारखाना पूर्ण झाल्यानंतर 10,000 नोकऱ्या (Job) उपलब्ध होणार आहेत. हा जगातील सर्वात मोठा स्कूटर तयार करणाऱ्या संयंत्रांपैकी एक असणार आहे. ज्याची उत्पादनक्षमता वर्षाला वर्षाला 20 लाख वाहनांची असणार आहे.

    ओलाचे व्यवस्थापक आणि समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (SEO) भाविश अग्रवाल म्हणाले, आम्ही हा कारखाना जूनपर्यंत उभारू. याची क्षमता 20 लाख वाहनांची असणार आहे. तथापि, कंपनीने आता ई-स्कूटची किंमत आणि अन्य बाबींविषयी खुलासा केलेला नाही. या दरम्यान कंपनीने म्हटले की, ओलाचं हायपर नेटवर्क जगातील सर्वाधिक व्यापक इलेक्ट्रिक दुचाकी चार्जिंग नेटवर्क असणार आहे.