जीएसआरटीसी कडून ऑलेक्ट्रा ला 50 EV बस पुरवण्यासाठी ऑर्डर

ऑलेक्ट्राकडे एकूण 1350 इलेक्ट्रिक बसेसच्या ऑर्डर आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचे एमडी के. व्ही. प्रदीप यांनी सांगितले की , “ GSRTC कडून 50 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर मिळाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे”. या नवीन ऑर्डरमुळे, आमच्या मागणीची संख्या सुमारे 1350 बसेसपर्यंत पोहोचली आहे.

    गांधीनगर : ऑलेक्ट्रा ग्रीनटेकला (Olectra Greentech) गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (GSRTC) 9 मीटरच्या 50 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर मिळाली आहे. ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्टवर (GCC) अतिरिक्त 50 इलेक्ट्रिक बसेस पुरवण्याचा आदेश आहे. या 50 इलेक्ट्रिक बसेस 12 महिन्यांच्या कालावधीत दिल्या जातील. कंपनी कराराच्या कालावधीत या बसेसची देखभाल करेल.

    या सह ऑलेक्ट्राकडे एकूण 1350 इलेक्ट्रिक बसेसच्या ऑर्डर आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचे एमडी के. व्ही. प्रदीप यांनी सांगितले की , “ GSRTC कडून 50 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर मिळाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे”. या नवीन ऑर्डरमुळे, आमच्या मागणीची संख्या सुमारे 1350 बसेसपर्यंत पोहोचली आहे. आम्ही आधीच सुरतमध्ये बस चालवत आहोत. या नव्या आदेशामुळे आता गुजरात राज्यात आमच्या 250 इलेक्ट्रिक बसेस येतील.

    आधुनिक सुविधांनी सुसज्ज इलेक्ट्रिक बस

    या 9 मीटर एसी बसमध्ये प्रवासी आरामदायी प्रवास करू शकतो. यात इलेक्ट्रॉनिक नियंत्रित एअर सस्पेंशनसह 33 अधिक एक ड्रायव्हर अशी आसन व्यवस्था आहे. प्रवाशांची सुरक्षीतेसाठी बसेस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहेत. इमरजन्सी बटण, युएसबी सॉकेट अशा गरजेच्या गोष्टी आहेत. बसमध्ये बसवलेली लिथियम-आयन बॅटरी ट्रॅफिक परिस्थिती आणि प्रवासी संख्या (बसमधील एकूण वजन) नुसार 180-200 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करण्यास सक्षम आहे. म्हणजेच सिंगल चार्जवर ही बस 180 ते 200 किलोमीटपर्यंत धावेल.

    इलेक्ट्रिक बसमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम आहे. तसेच हाय-पॉवर एसी चार्जिंग सिस्टीम या बॅटरीला 3-4 तासांच्या आत पूर्णपणे रिचार्ज करते. आरामदायक प्रवासासाठी बसला इलेक्ट्रॉनिक कंट्रोल एयर सस्पेंशन देण्यात आले आहे.