पियाजिओने भारतात लाँच केली आहे एप्रिलिया एसएक्सआर 125

ही अत्यंत आरामदायी, शैलीदार व उत्तम कामगिरी करणारी नवीन स्कूटर आहे आणि 125 सीसी इंजिनाच्या आकर्षक पर्यायामध्ये उपलब्ध आहे. ग्राहक आता एप्रिलिया डीएनएचा अनुभव नवीन एप्रिलिया एएक्सआर 125च्या माध्यमातून घेऊ शकतील.

  • सर्वाधिक आकर्षक आणि प्रशंसाप्राप्त एप्रिलिया एसएक्सआर श्रेणीत 125 सीसीच्या आणखी एका आकर्षक मॉडेलची भर
  • एप्रिलिया एसएक्सआर 125 ही 1,14,994/- या दराला (एक्स-शोरूम पुणे) उपलब्ध आहे
  • एप्रिलिया एएक्सआर मॉडेल श्रेणीतील उत्पादने भारतभरातील सर्व डीलरशिप्समार्फत बुक केली जाऊ शकतात
  • ही बाईक https://apriliaindia.com/ या वेबसाइटवरूनही बुक केली जाऊ शकते

पुणे : पियाजिओ इंडियाने आज एप्रिलिया एसएक्सआर 125 बाजारात आणल्याची घोषणा केली. प्रत्येक क्षणाला आयुष्याचा अधिकाधिक आनंद घेणाऱ्या मुक्त रायडर्सच्या वर्गासाठी एक नवीन रोचक कॅटेगरी निर्माण करणारी सर्वाधिक आकर्षक एप्रिलिया एसएक्सआर 160 बाजारात आणल्यानंतर पियाजिओ इंडियाच्या असे लक्षात आले की, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण ग्राहकांना निवडीसाठी अधिक पर्याय हवे आहेत. त्यातून एप्रिलिया एसएक्सआर 125 ची निर्मिती झाली.

ही अत्यंत आरामदायी, शैलीदार व उत्तम कामगिरी करणारी नवीन स्कूटर आहे आणि 125 सीसी इंजिनाच्या आकर्षक पर्यायामध्ये उपलब्ध आहे. ग्राहक आता एप्रिलिया डीएनएचा अनुभव नवीन एप्रिलिया एएक्सआर 125च्या माध्यमातून घेऊ शकतील. पूर्णपणे नवीन एप्रिलिया एसएक्सआर 125 ही 1,14,994/- अशा आकर्षक किंमतीला (एक्स-शोरूम पुणे) उपलब्ध असून, 5000/- रुपये प्रारंभिक रक्कम भरून भारतभरातील कोणत्याही डीलरशिपवरून किंवा https://apriliaindia.com/ या ई-कॉमर्स वेबसाइटवरून बुक केली जाऊ शकते.

एप्रिलिया एसएक्सआर 125 मध्ये एप्रिलियाच्या नवीनतम जागतिक डिझाइन शैली वापरण्यात आली आहे आणि या शैलीचा मेळ एका सिंगल-सिलिंडर, 4-स्ट्रोक, एअरकूल्ड, 3 फ्युएल इंजेक्शनच्या पर्यावरणपूरक इंजिन तंत्रज्ञानासोबत घालण्यात आला आहे. हे इंजिन 7600 आरपीएमवर 9.52 पीएस पीक पॉवर निर्माण करते.

सर्वोत्तम रायडिंग अनुभव आणि सर्वोच्च आराम देण्यासाठी एप्रिलिया एसएक्सआर 125 अधिक मोठ्या अधिक लांब, आरामदायी व एर्गोनॉमिक सीट्स देऊ करते. या सीट्स आर्ट लेदर स्युइडमध्ये तयार करण्यात आल्या असून, राखाडी व लाल रंगांच्या धाग्यांनी खास नमुन्यामध्ये त्यांची शिलाई करण्यात आली आहे. धरधरीत रूपरेखा, भौमितीय आराखडा आणि उच्च दर्जाच्या कारागिरीतून एएक्सआर 160ची आकर्षक गतीशीलता या मॉडेलमध्येही दिसून येते.

पियाजिओ इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डिएगो ग्राफी यावेळी म्हणाले, “एप्रिलिया एसएक्सआर या श्रेणीने 160 सीसीपासून सुरुवात करून आता 125 सीसीची स्कूटर आणत एक वर्तुळ पूर्ण केले आहे याबद्दल आज मला खूप आनंदही वाटत आहे आणि उत्साहही वाटत आहे. एप्रिलिया एसएक्सआर 125 हा 125 सीसी या सर्वाधिक आकर्षक इंजिन प्रकारांतील आणखी एक रोमांचक अनुभव आहे. आमची इंजिने ही 3 व्हॉल्व्ह्ज तसेच पर्यावरणपूरक उत्सर्जन करणाऱ्या फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञानाने युक्त असतात. त्यामुळे रायडिंगचा अनुभव आणि इंधनाचा उपयोग यांच्यात एक चांगला समतोल साधला जातो. हे उत्पादन बाजारात आणून आम्ही ‘मॅग्झिफाय लाइफ’ या तत्त्वावर विश्वास ठेवणाऱ्या एप्रिलियाच्या अनेक चाहत्यांना एप्रिलियाचा एक नवीन अनुभव देऊ शकू!”

या मॉडेलच्या अनोख्या, अतुलनीय स्वरूपाला 3 कोट बॉडी पेण्ट फिनिशची जोड देण्यात आली आहे. एप्रिलियाचे वैशिष्ट्य असलेली ग्राफिक्स यावर आहेत. मॅट ब्लॅक डिझाइन ट्रिम इन्सर्टससोबत डार्क क्रोम घटकही यात दिलेले आहेत. रॅप अराउंड एलईडी तंत्रज्ञानाने युक्त असे दोन क्रिस्टल हेडलाइट्स आणि आय लाइन स्थितीतील लाइट्सना फ्रण्ट इंडिकेटर ब्लिंकर्सची जोड मिळाल्याने प्रकाशाचा अनोखा खेळ निर्माण होतो; एलईडी टेललाइट्सच्या भवतीचे डायमंड रिफ्लेक्शन मागील ब्लिंकर्समध्ये मिसळल्यामुळे नवीन पिढीतील ग्राहकांना हवे असलेले आकर्षण निर्माण होते. एसएक्सआर 125 कॉम्बी ब्रेकिंग सिस्टमने (सीबीएस) युक्त आहे. शिवाय यात व्हेंटिलेटेड डिस्क ब्रेक आणि ट्विन पॉट्स कॅलिपर्स देण्यात आले आहेत. एप्रिलिया एसएक्सआर 125 अत्यंत आकर्षक अशा ग्लॉरी रेड, मॅट ब्ल्यू, ग्लॉसी व्हाइट आणि मॅट ब्लॅक रंगांमध्ये उपलब्ध होईल.

मोठ्या २१० चौरस सेंटीमीटर बहुकार्यात्मक डिजिटल क्लस्टर डिसप्लेने सुसज्ज असलेल्या एकएक्सआर 125 मध्ये डिजिटल स्पीड इंडिकेटर, आरपीएम मीटर, मायलेज इंडिकेटर, सरासरी स्पीड अँड टॉप डिसप्ले, डिजिटल फ्युएल इंडिकेटर अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. ग्राहक ब्ल्यूटूथ मोबाइल कनेक्टिव्हिटी ॲक्सेसरीचा पर्यायही निवडू शकतात. ही ॲक्सेसरी यूजरच्या मोबाइल व स्कूटरला जोडते आणि कनेक्टिव्हिटीच्या अनेक सुविधांचा लाभ घेतला जाऊ शकतो. एसएक्सआर 12व्ही, 5.0 एएच एमएफ बॅटरीने युक्त आहे आणि स्कूटरची इंधन क्षमता 7 लीटर आहे.