पियाजिओ इंडियाने आयकॉनिक Vespaची गौरवशाली ७५ वर्षे साजरी केली, याप्रसंगी वेस्पाच्या ७५व्या आवृत्तीचे केले अनावरण

वेस्पा ७५, तिच्या प्रतिकात्मक भक्कम पूर्ण स्टील बॉडीमध्ये सादर केली आहे, जे वेस्पाला विशेष बनविणाऱ्या ब्रॅण्ड्चा ऐतिहासिक वारसा आणि अद्वितीय गुण दर्शवते, वेगळा चमकदार मेटॅलिक गियलो ७५-एक मूळ मेटॅलिक पिवळा रंग १९४० च्या दशकातील फॅशनच्या रंगछटेतील रंगांचा समकालीन अर्थ सादर करतो.

  • वेस्पा ७५, मर्यादित संख्येमध्ये भारतातील वेस्पाच्या सर्व अधिकृत विक्रेत्यांकडे उपलब्ध असेल
  • मऊ नोबुक लेदर अनुभव देणारे गडद करड्या रंगाचे सीट्स
  • ऐतिहासिक चित्रित स्वागत किटसह गोलाकार बॅग, यासह १२५ सीसी आणि १५० सीसीत वेगळ्या चमकदार मेटॅलिक गियालो रंगामध्ये उपलब्ध होईल

पुणे : व्हेस्पा(Vespa)चे निर्माते पियाजिओ इंडिया (Piaggio India) आयकॉनिक वेस्पाची गौरवशाली ७५ वर्षे, स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि जागतिक संस्कृती निर्माण करणारे अमर्यादित कल, साजरे करतानाच, विशेष वेस्पाची ७५वी आवृत्ती (Special Vespa 75th Edition) सादर करत १९४० पासून सुरू झालेल्या ब्रँडचे सर्व सांस्कृतिक आणि विविध शैलींचे पडाव साजरे करत आहे, ही वेस्पा ७५ आयकॉनिक ब्रॅण्डच्या भव्य ऐतिहासिक प्रवासाच्या आकर्षित करणाऱ्या आठवणींमध्ये लालित्य, शैली आणि अत्याधुनिकतेचे प्रतिक आहे.

वेस्पा ७५, तिच्या प्रतिकात्मक भक्कम पूर्ण स्टील बॉडीमध्ये सादर केली आहे, जे वेस्पाला विशेष बनविणाऱ्या ब्रॅण्ड्चा ऐतिहासिक वारसा आणि अद्वितीय गुण दर्शवते, वेगळा चमकदार मेटॅलिक गियलो ७५-एक मूळ मेटॅलिक पिवळा रंग १९४० च्या दशकातील फॅशनच्या रंगछटेतील रंगांचा समकालीन अर्थ सादर करतो. वेस्पा अभिमानाने तिच्या बाजूच्या पॅनल्सवर ७५ क्रमांक प्रदर्शित करते आणि समोरचा बम्पर हा मॅट मेटॅलिक पायराईट रंगात प्रदर्शित होतो जो क्रोम इन्सर्टसह फ्रंट टाईशी जुळतो, त्यासोबत ग्लोव्ह बॉक्स शील्डवरील क्रोम 75th हा लोगो त्याच्या प्रतिष्ठेचे प्रतीक दर्शवतो, ७५ ही विषयवस्तू वारसा, वेस्पाचे नाविन्यपूर्ण भाव आणि फॅशनवर-प्रेम करणारी शैली आठवून देते. विशेष रीतीने मऊ लेदर नोबुकमध्ये बनविलेले सीट्स, गडद धुरकट करड्या रंगातील थीमचा अनुभव करून देतात.

नोबुक लेदर अनुभव देणाऱ्या सामग्रीने शिवलेली दुहेरी उद्देशांची बॅग, मागे घेण्यायोग्य क्रोम रिअर रॅकवर बसविण्यायोग्य एक मोहक अ‍ॅक्सेसरी म्हणून काम करते, ती प्रतीकात्मक वेस्पाच्या अतिरिक्त चाकाचे प्रतिनिधित्व प्रतिबिंबित करते, धुरकट राखाडी रंगातील मिश्रधातू पासून बनवलेली यांत्रिकीकृत चाके आणि समोरील वाऱ्यापासून बचाव करणारी समोरील काच, हे थीमला पूरक आहेत, वेस्पा ७५, जमा करण्यायोग्य पोस्टकार्ड आणि व्हिन्टेज वेस्पा चिन्हांद्वारे तिचा ऐतिहासिक प्रवास दर्शविणाऱ्या किटसह नवीन युगात तुमचे स्वागत करते आणि या अभिजात व गंभीर ब्रॅण्डचा अनुकरणीय प्रवास दर्शविते, वेस्पा ७५, ब्रँडच्या ओळखीला आदर अर्पण करते आणि एकाच वेळी कालातीत प्रतीकात्मक डिझाइनद्वारे गतिशीलतेच्या भविष्याचा शोध घेते.

पियाजिओ इंडियामध्ये आम्ही मुक्तता, मौलिकता, उत्स्फूर्तता आणि नवीनता या वेस्पा संस्कृतीमध्ये जगतो, वेस्पा ही प्रकाश गतिशीलतेसोबत मुक्ती, स्वातंत्र्य, नाविन्याचा शोध या कल्पना जगली आहे. नेहमीच ताजीतवानी, दुमदुमणारी, तरुण आणि अपारंपरिक असणारी वेस्पा ७५ आवृत्ती, प्रतीकात्मक इतिहास आणि वेस्पाचे विशेष मूल्य साजरी करते आणि त्यांना विशेष कौशल्यासह चित्रित करते, जसे आपण वेस्पा ७५ च्या माध्यमातून स्वातंत्र्याचे मूल्य साजरे करत आहोत, तेव्हा ते व्हेस्पाचा भारतातील प्रवास देखील साजरा करतात जेव्हा भारत स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करतो.

दिएगो ग्राफी, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पियाजिओ इंडिया

वेस्पा हे फक्त एक वाहन नाही तर जीवनशैलीचे प्रतीक आहे, ज्याने जागतिक पातळीवर स्थान मिळवले आहे आणि विविध काळात कल पार केला आहे. कल्पकतेने डिझाइन केलेल्या वेस्पा ७५ आवृत्तीची गौरवशाली ७५ वर्षे साजरी करतांना, तिच्या मूल्यांमधून भविष्याच्या गतिशीलतेकडे पाहत इतिहासातील सर्वात रोमांचक प्रवासाचे दर्शन घडवते, वेस्पा ७५, वेस्पाच्या चाहत्यांना स्वातंत्र्य आणि मौलिकतेच्या मूल्यांचे प्रतिक करण्याची संधी देऊ करते.

सुधांशू अग्रवाल, २ व्हिलर, व्यवसाय प्रमुख, पियाजिओ इंडिया

वेस्पा ७५ ही, १२५ आणि १५० सीसी इंजिन या पर्यायांमध्ये सादर केली जाईल, यात सेंटर इंटिग्रेटेड डीआरएलसह उच्च लुमेन एलईडी हेडलाइट हे वैशिष्ट्य आहे. १५० सीसी मध्ये फ्रंट डिस्क ब्रेक अँटी-लॉक ब्रेकिंग प्रणाली (एबीएस) आणि १२५ सीसी मध्ये कॉम्बी ब्रेकिंग प्रणाली (सीबीएस) आहे. वेस्पाची ही विशेष आवृत्ती देशातील सर्व वेस्पाच्या अधिकृत विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे आणि भारतातील सर्व अधिकृत विक्रेत्यांकडे व ई-कॉमर्स वेबसाइट https://shop.vespaindia.com द्वारे, आरंभिक भारतीय रुपये ५००० भरून आरक्षित केली जाऊ शकते.