पियाजिओकडून कार्गो व पॅसेंजर विभागातील इलेक्ट्रिक वाहनांची आपे इलेक्ट्रिक एफएक्‍स श्रेणी सादर

पॅसेंजर वेईकल आपे ई-सिटी एफएक्‍स ही सर्वात लाभदायी तीनचाकी आहे. या वेईकलची उच्‍च दर्जात्मक वैशिष्‍ट्ये व आरामदायी राइड अधिक ट्रिप्‍स व उत्तम उत्‍पन्‍नाची खात्री देतात.

  मुंबई : पियाजिओ वेईकल्‍स प्रा. लि. (पीव्‍हीपीएल) ही दुचाकी विभागातील युरोपियन प्रमुख कंपनी इटायलियन पियाजिओ ग्रुपची १०० टक्‍के उपकंनी आणि भारताच्‍या आघाडीच्‍या लघु व्‍यावसायिक वाहनांच्‍या उत्‍पादक कंपनीने आज कार्गो व पॅसेंजर विभागांमध्‍ये इलेक्ट्रिक वाहनांची एफएक्‍स श्रेणी (फिक्‍स्‍ड बॅटरी) सादर केली.

  नवीन आपे ई-एक्‍स्‍ट्रा एफएक्स ही ९.५ किलोवॅट पॉवर आऊटपुट असलेली विभागातील सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रिक कार्गो आहे. ही वेईकल उपयुक्‍त ६ फूट लांब कार्गो डेकसह प्रमाणित पूर्णत: मेटल बॉडी रचनेसह येते. तसेच ही वेईकल डिलिव्‍हरी व्‍हॅन, कचरा गोळा करणे इत्‍यादी सारख्‍या उपयोजनांसाठी सानुकूल देखील आहे.

  पॅसेंजर वेईकल आपे ई-सिटी एफएक्‍स ही सर्वात लाभदायी तीनचाकी आहे. या वेईकलची उच्‍च दर्जात्मक वैशिष्‍ट्ये व आरामदायी राइड अधिक ट्रिप्‍स व उत्तम उत्‍पन्‍नाची खात्री देतात.

  दोन्‍ही उत्‍पादनांमध्‍ये अव्‍वल दर्जाच्‍या श्रेणीची वैशिष्‍ट्ये आहेत- जसे ब्‍ल्‍यू व्हिजन हेडलॅम्‍प्‍स, ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन, हिल होल्‍ड असिस्‍ट, रिजनरेटिव्‍ह ब्रेकिंग, ड्युअल टोन सीट्स, आकर्षक रंग व ग्राफिक्‍स, मल्‍टी-इन्‍फॉर्मेशन इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर, बूस्‍ट मोड इत्यादी. एफएक्‍स फिक्‍स्‍ड बॅटरी श्रेणीमध्‍ये घरी व कार्यालयामध्‍ये सोईस्‍करपणे चार्जिंग करता येईल अशी वैशिष्‍ट्ये आहेत.

  याप्रसंगी बोलताना पियाजिओ व्हेईकल्‍स प्रा. लि.चे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक डायगो ग्रॅफी म्‍हणाले, ”आपे हा ३० लाखांहून अधिक आनंदी ग्राहकांचा विश्‍वास असलेला ब्रॅण्‍ड इलेक्ट्रिक वाहनांच्‍या एफएक्‍स श्रेणीसह भारतीय इलेक्ट्रिक क्रांतीच्‍या दिशेने वाटचाल करत आहे. पियाजिओ ग्रुपचा मागील 4 दशकांपासून इलेक्ट्रिक तंत्रज्ञान विकसित करण्‍याचा संपन्‍न वारसा आहे, ज्‍याचा आम्‍ही लाभ घेत भारतासाठी दर्जात्‍मक उत्‍पादने विकसित करतो. २०१९ मध्‍ये स्‍वॅपेबल तंत्रज्ञान असलेल्‍या आपे ई-सिटीच्‍या सादरीकरणानंतर आम्‍ही आता ग्राहकांच्‍या वैविध्‍यपूर्ण गरजांची पूर्तता करण्‍यासाठी फिक्‍स्‍ड बॅटरी तंत्रज्ञान सादर करत आहोत. ही नवीन एफएक्‍स श्रेणी भारतामध्‍ये ईव्‍हींच्‍या मोठ्या प्रमाणात अवलंबेप्रती असलेल्‍या सरकारच्‍या उपक्रमांशी संलग्‍न पियाजिओच्‍या दृष्टिकोनाच्‍या दिशेने उचलण्‍यात आलेले एक पाऊल आहे.”

  फेम २ सबसिडी, किंमत व बुकिंग:

  आपे इलेक्ट्रिक एफएक्‍स श्रेणी फेम २ सबसिडी आणि नोंदणी प्रक्रियेशी संबंधित इतर विविध लाभांसाठी पात्र आहे. फेम २ सबसिडीचा लाभ मिळाल्‍यानंतर आपे ई-एक्‍स्‍ट्रा एफएक्‍स सुरूवातीची एक्‍स–शोरूम किंमत रूपये 3,12,137 सह येते आणि आपे ई-सिटी एफएक्‍स सुरूवातीची एक्‍स-शोरूम किंमत रूपये 2,83,878 सह येते.

  आपे इलेक्ट्रिक एफएक्‍स वेईकल्‍स www.buyape.in या वेबसाइटवर ऑनलाइन किंवा टोल फ्री क्रमांक 1800-120-7520 वर संपर्क साधन बुक करता येऊ शकतात. मोठ्या ऑर्डर्सच्‍या विनंती ape.Electric@piaggio.co.in येथे करता येऊ शकतात.

  डिलरशिप चौकशीसाठी +91-9823790876 येथे संपर्क साधा किंवा cbd@piaggio.co.in येथे मेल पाठवा.