Honda कार इंडियाचे नवीन Jazz साठी प्री-लाँच बुकिंग सुरू

भारतामधील प्रीमिअम कारची निर्माती होंडा कार्स इंडिया लिमीटेड (HCIL) ने तिच्या येणाऱ्या नवीन जाझची प्री-लाँच बुकिंग सुरू केली आहे.

मुंबई :  भारतामधील प्रीमिअम कारची निर्माती होंडा कार्स इंडिया लिमीटेड (HCIL) ने  तिच्या येणाऱ्या नवीन जाझची प्री-लाँच बुकिंग सुरू केली आहे. नवीन जाझची निर्मिती स्पोर्टी नवीन स्टाइल मध्ये करण्यात आली आहे, त्यामध्ये उत्तम पॅकेजिंग, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि फंक्शन्स आहेत.

नाविण्यपूर्ण आणि रिफाइंड अपग्रेडेशन, नवी जाझ मॅन्युअल आणि सीव्हीटी ट्रान्समिशन दोन्हींमध्ये BS-6 अनुरूप 1.2L i-VTEC पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे तसेच या गाडीत विश्वस्तरीय सुरक्षेची वैशिष्ट्ये सुद्धा समाविष्ट करण्यात आली आहेत.

नवीन जाझची वैशिष्ट्ये

>> वन टच इलेक्ट्रीक सनरूफ
>> क्रोम एजंटसह नवीन हाय ग्लॉस ब्लॅक ग्रीलचा समावेश
>> स्टायलिश आणि स्पोर्टी एक्सटिरियर
>> अत्याधुनिक DRL सह नवीन एलइडी हेडलँप (इनलाइन शेल) चा एलइडी पॅक
>> नवीन डिझाइन असलेले समोरील आणि मागील बंपर
>> ‘वन टच इलेक्ट्रीक सनरूफ’ आणि क्रुइस कंट्रोलची सुधारित सोय
>> स्मार्ट एंट्री आणि पुश बटनने मॅन्युअल आणि सीव्हीटी दोन्ही प्रकारांमध्ये सिस्टीम स्टार्ट/स्टॉप करणे
>> सीव्हीटी प्रकारासाठी स्टिअरिंग-व्हील-माउंटड युनिक ड्युअल मोड “पॅडल शिफ्ट” पर्यायाने समृद्ध
यामुळेच गेल्यावर्षी एकूण जाझ विक्रीत जवळपास 70 टक्के कार याच कारणाने विकल्या गेल्या होत्या.

नवीन जाझची पूर्व नोंदणी (प्री-बुकिंग) देशभरातील HCIL च्या अधिकृत डीलरकडे जाऊन 21,000 रूपयांना करू शकता. या कारची HCIL च्या वेबसाइटवर जाऊनही केवळ 5,000 रूपये भरून ‘होंडा फ्रॉम होम’ च्या माध्यमातून बुकिंग करता येणार आहे.

नवीन जाझ बद्दल बोलताना, होंडा कार्स इंडिया लिमिटेडचे विपणन आणि विक्री विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि संचालक श्री. राजेश गोयल म्हणाले “या महिन्याच्या शेवटी चालू होणाऱ्या नवीन जाझचे बुकिंग ओपन केल्याबद्दल आम्ही फार उत्सुक आहोत. स्टायलिश स्पोर्टी नवीन लूकसह असलेली नवीन जाझ ज्यामध्ये अप्रतिम इंटेरियर पॅकेज आणि सेगमेंटमधील निराळे वैशिष्ट्य म्हणजे वन टच इलेक्ट्रीक सनरूफ आहे. ही कार या सेगमेंट मधील सर्वोत्तम उपाय शोधणाऱ्या ग्राहकांना आनंद देणार आहे.”

“मागील काही वर्षांमध्ये, जाझचे ग्राहक पेट्रोल पॉवरट्रेन्सला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देत असल्याचे आम्ही निरीक्षण केले आहे. या प्रकाराला प्रतिसाद देत, मॅन्युअल आणि सीव्हीटी दोन्ही प्रकारात नवीन जाझमध्ये पेट्रोल इंजिन आणण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या नवीन सुविधेसह आणि आपल्या सर्वांसमोर उत्सवाचे वातावरण असल्यामुळे, आम्हाला प्रिमिअम हॅचबॅक सेगमेंट मध्ये उत्सुकता दिसत आहे.” असेही गोयल पुढे म्हणाले.

जागतिक क्षेत्रामध्ये जाझ ही होंडाची एक अष्टपैलू प्रिमिअम हॅचबॅक आहे. तिचा स्टायलिश लूक, निराळे पॅकेजिंग, उत्तम आरामदायी केबिन, उच्च दर्जाचे इंटेरिअर आणि ड्रायव्हिंगचा आनंद यामुळे तिचे कौतुक होईल यात शंका नाही.