नवी रेट्रो XSR 250 मोटरसायकल लाँच करण्याच्या तयारीत; फोटो पहा…

या मोटरसायकलमध्ये यामाहा FZ25 मोटरसायकलचे काही भाग वापरले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये मोटरसायकलचे डिझाईन, पावर आणि सस्पेंशनमध्ये याचा वापर केला जाऊ शकतो. नव्या XSR 250 मध्ये सध्याच्या यामहा 250 मोटरसायकलसारखेच व्हील्स, बॉक्स सेक्शन स्विंग आर्मसोबत टेलिस्कोपिक फोर्क देण्यात येणार आहे. या मोटरसाकयलमध्ये 249 सीसीचे एअर कुल्ड इंजिन देण्याची शक्यता आहे.

    Yamaha Motor लवकरच भारतात रेट्रो क्लासिक मोटरसायकल XSR 250 लाँच करण्य़ाची शक्यता आहे. ही मोटरसायकल केवळ ताकदवान नाही तर याचे डिझाईनही ग्राहकांच्या आवडी पाहून बनविण्य़ात आले आहे. येत्या उत्सवी सिझनपर्यंत ही बाईक बाजारात येण्याची शक्यता आहे.  XSR 250 मोटरसायकलला नुकतीच चाचणी घेताना पाहण्यात आले आहे. यानंतर भारतात या मोटरसायकलच्या लाँचिंगची शक्यता वाढली आहे. Yamaha Motor XSR 250 च्या डिझाईन आणि फिचरवर बोलायचे झाले तर ही रेट्रो लुकमधली कार आहे. तरीही खूप मॉडर्न वाटणार आहे.

    या मोटरसायकलमध्ये यामाहा FZ25 मोटरसायकलचे काही भाग वापरले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये मोटरसायकलचे डिझाईन, पावर आणि सस्पेंशनमध्ये याचा वापर केला जाऊ शकतो. नव्या XSR 250 मध्ये सध्याच्या यामहा 250 मोटरसायकलसारखेच व्हील्स, बॉक्स सेक्शन स्विंग आर्मसोबत टेलिस्कोपिक फोर्क देण्यात येणार आहे. या मोटरसाकयलमध्ये 249 सीसीचे एअर कुल्ड इंजिन देण्याची शक्यता आहे. हे इंजिन फ्यूअल इंजेक्टेड सिंगल सिलिंडर असणार आहे. तसेच हे इंजिन 20.5 bhp ची ताकद देणार आहे व 20.1 Nm चा पीक टॉर्क देणार आहे.