रतन टाटांकडून झाली चूक, व्यवहार फसला; आता अशी करणार भरपाई

एकेकाळी रतन टाटा टाटा मोटर्सची विक्री करण्यासाठी फोर्डकडे गेले होते. तेव्हा फोर्डच्या मालकाने आम्ही तुमच्यावर टाटा मोटर्स विकत घेऊन उपकार करत आहोत, असे म्हटले होते. काही वर्षांनी रतन टाटांनी टाटा मोटर्स नफ्यात आणलीच परंतु फोर्डकडची जग्वार विकत घेतली. तेव्हा त्याच फोर्डच्या मालकाने जग्वार विकत घेऊन तुम्ही आमच्यावर उपकार करत असल्याचे म्हटले होते.

  देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनी एका बड्या कंपनीवर डाव खेळला होता. परंतु त्यांचा हा व्यवहार फसल्यात जमा आहे. ही कंपनी आता टाटा मोटर्सवर (Tata Motors) ओझे बनू लागली आहे. यामुळे टाटा मोटर्सला आपला डोलारा सांभाळून दरवर्षी एक मोठी रक्कम या कंपनीमध्ये गुंतवावी लागत आहे.

  टाटा ट्रस्टचे मानद अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांनी 2008 मध्ये लक्झरी वाहन निर्माता कंपनी जग्वार लँड रोव्हर (Jaguar Land Rover) विकत घेतली होती. असे म्हटले जाते की, एकेकाळी रतन टाटा टाटा मोटर्सची विक्री करण्यासाठी फोर्डकडे गेले होते. तेव्हा फोर्डच्या मालकाने आम्ही तुमच्यावर टाटा मोटर्स विकत घेऊन उपकार करत आहोत, असे म्हटले होते. काही वर्षांनी रतन टाटांनी टाटा मोटर्स नफ्यात आणलीच परंतु फोर्डकडची जग्वार विकत घेतली. तेव्हा त्याच फोर्डच्या मालकाने जग्वार विकत घेऊन तुम्ही आमच्यावर उपकार करत असल्याचे म्हटले होते.

  काहीही असले तरी देखील हा सौदा टाटा मोटर्सला (Tata Motors) डोईजड ठरत आहे. रतन टाटांनी 1990 ते 2012 पर्यंत टाटा ग्रुपचे अध्यक्षपद भूषविले आहे. या काळात ते टाटा ट्रस्टचे मानद अध्यक्षही होते. रतन टाटांनी त्यांच्या दैदिप्यमान कारकीर्दीमध्ये अनेक कंपन्या विकत घेतल्या आणि त्या आज चांगल्या स्थितीतही आहेत. मात्र, ही एक अशी कंपनी आहे ज्याचा व्यवहार फसला आहे.

  टाटा ही कंपनी सुरु ठेवण्यासाठी दरवर्षी हजारो कोटी रुपये या कंपनीला देत असतात. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी शुक्रवारी कंपनीच्या व्हर्च्युअल एजीएममध्ये सांगितले की, जग्वारमध्ये या आर्थिक वर्षात जवळपास 25 हजार कोटी रुपये गुंतविले जाणार आहेत. गेल्या वर्षीदेखील टाटाने जग्वार लँड रोव्हरमध्ये 19,800 कोटी रुपये गुंतविले होते.

  इलेक्ट्रीक व्हेईकल

  टाटा कंपनी इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनासाठी वेगळा निधी गोळा करणार आहे. मध्यम ते दीर्घ काळासाठी इलेक्ट्रीक व्हेईकल मधून मिळणारे उत्पन्न 25 टक्के करणार आहे. सध्या यातून 2 टक्के महसूल मिळत आहे. टाटा मोटर्समध्ये 3500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

  ratan tata purchased jaguar 2008 tata motors invest rs 28900 crore jlr