Reasons for buying an electric vehicle
इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याची पाच कारणे

स्वच्छ उर्जेवर चालणा-या वाहनांकडे वळणे, हे श्वाश्वततेवर आधारीत भवितव्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. विविध वाहन निर्मात्या कंपन्यांनीही आता इलेक्ट्रिक वाहन निर्मितीवर भर देण्यास सुरुवात केली आहे.

हवामानाच्या संकटाकडे दुर्लक्ष करणे, दिवसेंदिवस कठीण होत आहे, अनेक देश तसेच व्यक्ती याविषयीचे महत्त्व व त्याच्या परिणामांबाबत जगभरात जागरूकता निर्माण करत आहेत. वैयक्तिक पातळीवर कार्बन फुटप्रिंट कमी करताना नियामक पातळीवर प्लास्टिकचा वापर बंद करणे, तसेच तो कमी करण्यासाठी लोक मार्ग शोधत आहेत. याद्वारे वेळेतच पर्यावरणाला झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

स्वच्छ उर्जेवर चालणा-या वाहनांकडे वळणे, हे श्वाश्वततेवर आधारीत भवितव्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. विविध वाहन निर्मात्या कंपन्यांनीही आता इलेक्ट्रिक वाहन निर्मितीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. एमजी मोटर (मॉरिस गॅरेज) नेदेखील जानेवारी महिन्यात झेडएस ईव्ही लॉन्चसह या क्षेत्रात पाऊल ठेवले असून याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. वाहन खरेदी करताना पुढील वाहन इलेक्ट्रिक वाहन का असावे याबद्दल जाणून घेऊयात.

ईलेक्ट्रिक वाहने ही भविष्यातील वाहने:

वाहन क्षेत्रातील सध्याच्या प्रगतीच्या मार्गानुसार, ईव्हीमध्ये एक तर्कशुद्ध बाब आहे. जीवाश्म इंधनावर चालणा-या वाहनांना बाजूला सारण्याचे वाढते प्रमाण, यातच या ट्रेंडचे भवितव्य दिसून येते. तांत्रिक प्रगतीमुळे अपारंपरिक, शाश्वत ऊर्जा स्रोत हे अधिक व्यवहार्य आणि किंमतीनुसार प्रभावी असून वाहन उद्योग वेगाने नावीन्यपूर्ण वीज निर्मिती पर्याय स्वीकारत आहे. परिणामी, इलेक्ट्रिक आधारीत वाहने ही सर्वसामान्य बनत असून, इंटर्नल कम्बस्शचन इंजिन्स (आयसीई) हे या चक्रात मागे पडत आहेत.

खात्रीशीररित्या कनेक्टेड कार:

एआय आयओटी-आधारीत तंत्रज्ञानाच्या उदयामुळे कनेक्टेड, स्मार्ट सोसायटीज या संकल्पनेकडे जग प्रगती करत आहे. भविष्यातील दृष्टीकोन हा अधिक स्पष्टतेकडे नेणारा असून यात प्रकारच्या अत्याधुनिक वाहन वैशिष्ट्यांचा तसेच ऑपरेशन्सचा समावेश आहे.

इलेक्ट्रिक वाहनांमध्ये, आपण अनेक गंभीर गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकतो. उदा. आपले वाहन जिओफेन्सिंग करणे, त्याचे लोकेशन तपासणे, जवळपासचे चार्जिंग स्टेशन शोधण्यासाठी चार्जिंगची स्थिती पाहणे, इथपासून दूरूनच कार प्री कूल किंवा प्री हीट करण्यासाठी एसी सिस्टिम स्मार्टफोनद्वारे ॲक्टिव्हेट करता येते. यासह, जगातील अग्रगण्य उत्पादकांनी तयार केलेल्या ईव्हींमध्ये इन-बिल्ट ओटीए क्षमता असतात. म्हणजेच ही कार नेहमीच कनेक्टेड असून सर्वाधिक अप-टू-डेट माहितीनुसार काम करते.

उत्तम लेगरूम व स्टोरेज:

दुचाकी असो वा चार चाकी सर्व ईव्ही गिअरलेस आहेत. याचा अर्थ असा की, या लहनांमध्ये अधिक प्रशस्त आणि आरमदायक केबिन, अधिक लेगरुम आणि मोठी स्टोरेजची जागा असते. गिअर लिव्हर नसल्याचा आणखी एक अर्थ असा की, केबिनच्या मागील भागात एक सपाट जागा असेल, त्यामुळे मध्यभागी बसलेल्या प्रवाशाला उत्तम प्रवासाचा आनंद मिळेल. पारंपरिक इंटरनल कम्बस्शचन इंजिन नसल्यामुळे समोरील हुडखाली मोठी जागा असून जास्त स्टोरेज पर्याय मिळतात.

शांततेची अनुभूती मिळते:

कोणतीही यांत्रिक इंजिन नाही म्हणजे गोंगाट नाही. इलेक्ट्रिक मोटर कोणताही आवाज न करता काम करते. त्यामुळे प्रवासी आणि चालकाला आवाज विरहित प्रवासाचा अनुभव घेता येतो. कोणत्याही अडथळ्याविना तुम्ही पुस्तक वाचू शकतात आणि संगीताचा अनुभव घेऊ शकता. यात कोणत्याही अप्रिय गोष्टींची अडचण येणार नाही.

सुपर स्मूथ ड्रायव्हिंगचा अनुभव:

इलेक्ट्रिक मोटर ही केवळ आवाजविरहित असते, असे नव्हे तर टॉर्कच्या बाबतीतही ही अधिक आकर्षक आणि उत्कृष्टतेचा अनुभव देते. यामुळे सर्वोत्कृष्ट व विनाअडथळा वाहन चालवण्याचा अनुभव मिळतो, जो इतर पारंपरिक वाहनांमध्ये सहसा दिसून येत नाही.