रेनो इंडियाने नव्या स्क्रॅपेज पॉलिसीला पाठिंबा दर्शविण्यासाठी केली सेरो रिसायकलिंगशी भागीदारी

रेनो इंडियाने सध्या दिल्ली व एनसीआर, चेन्नई, मुंबई, पुणे आणि बंगळुरू या सहा ठिकाणी हा कार्यक्रम सुरू केला आहे. इच्छुक ग्राहक, जे त्यांचे जुने / आयुर्मान संपलेले वाहन रेनोच्या अधिकृत डीलरशिपमध्ये आणतील, त्यांना वाहनाचे मूल्यमापन करून न्याय्य स्क्रॅप मूल्यांकनाचा प्रस्ताव देण्यात येईल, त्याचप्रमाणे क्विड, ट्रायबर आणि डस्टर या रेनोच्या उत्पादनांवर असलेल्या विद्यमान मासिक ऑफर्ससोबतच असलेले अतिरिक्त स्क्रॅप लाभ देण्यात येतील.

  • खात्रीशीर स्क्रॅप लाभांसह सुरळीत स्क्रॅपिंग प्रक्रियेसाठी सादर केला R. E. L. I. V. E कार्यक्रम

मुंबई : रेनो इंडियाने सेरो रिसायकलिंग (महिंद्रा इंटरट्रेड लिमिटेड आणि एसएमटीसी या भारत सरकारच्या उपक्रमाचे जॉइंट व्हेंचर) या भारतातील पहिल्या संघटित स्क्रॅप व्हेइकल रिसायकलिंग कंपनीच्या भागीदारीने R. E. L. I. V. E प्रोग्रॅम सुरू केला आहे. जुनी वाहने स्क्रॅप करण्यासाठी आणि नवीन रेनो वाहने विकत घेण्यासाठी व नवी खरेदी करताना आकर्षक लाभ उपलब्ध करून देण्यासाठी संभाव्य ग्राहकांना सुरळीत माध्यम उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

रेनो इंडियाने सध्या दिल्ली व एनसीआर, चेन्नई, मुंबई, पुणे आणि बंगळुरू या सहा ठिकाणी हा कार्यक्रम सुरू केला आहे. इच्छुक ग्राहक, जे त्यांचे जुने / आयुर्मान संपलेले वाहन रेनोच्या अधिकृत डीलरशिपमध्ये आणतील, त्यांना वाहनाचे मूल्यमापन करून न्याय्य स्क्रॅप मूल्यांकनाचा प्रस्ताव देण्यात येईल, त्याचप्रमाणे क्विड, ट्रायबर आणि डस्टर या रेनोच्या उत्पादनांवर असलेल्या विद्यमान मासिक ऑफर्ससोबतच असलेले अतिरिक्त स्क्रॅप लाभ देण्यात येतील.

रेनो इंडिया डीलरशिप आणि सेरो रिसायकलिंग यांच्याकडून वाहनाचे मूल्यमापन, आरटीओमध्ये अधिकृत डि-रजिस्ट्रेशन (रजिस्ट्रेशन रद्द करणे), जुन्या वाहनाच्या जमा केल्याचे /विल्हेवाट लावल्याचे अधिकृत प्रमाणपत्र देणे, या सर्व प्रक्रिया वाप पाडल्या जातात जेणेकरून ग्राहकांना सुरळीत विनाअडथळा अनुभव मिळेल. रेनो हे एक्स्क्लुसिव्ह विशेष माध्यम, आपली जुनी दुचाकी स्क्रॅप करून इच्छिणाऱ्यांनाही उपलब्ध करून देत आहे आणि याद्वारे नव्या रेनो उत्पादनांच्या खरेदीसाठी रेनो फायनान्सकडून ७.९९% इतक्या व्याजदराने आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

स्क्रॅपेज धोरण आणि भागीदारीबद्दल रेनो इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री हेड आणि व्यवस्थापकीय संचालक वेंकटराम मामिलापल्ली म्हणाले, “भारताला निर्मितीकेंद्र करण्यासाठी आणि तंत्रज्ञान स्वीकारार्हता, सुरक्षित व पर्यावरण अनुकूलतेच्या बाबतीत भारतीय मोटार उद्योगाला वर नेण्यासाठी स्क्रॅपेज धोरण हे योग्य दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणावर कमी करणे आणि देशातील असंघटित व विखुरलेली रिसायकल बाजारपेठ सुरळीत करण्यासाठी स्क्रॅपेज धोरणाची मदत होईल.”

“या भागीदारीमुळे ग्राहकांना विनाअडथळा अनुभव मिळेल, नव्या तंत्रज्ञानाच्या स्वीकारले जाईल आणि शास्त्रीय व पर्यावरणस्नेही पद्धतीने भारतीय रस्त्यांवरील सुरक्षिततेला चालना मिळेल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आपल्या पर्यावरणस्नेही कार्यपद्धतींमुळे सेरोची कार्बन फुटप्रिंट कमी करण्यास मदत होईल आणि शून्य-कचरा, शून्य प्रदूषण परिसंस्था तयार करता येईल आणि रेनोकडून नव्या वाहनाच्या खरेदीवर आकर्षक आणि एक्स्क्लुसिव्ह लाभ देण्यात येतील.”

या उपक्रमाविषयी महिंद्रा इंटरट्रेड लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुमीत इसार म्हणाले, “सेरो हे मोटार वाहनांसाठीचे भारतातील पहिले सरकारमान्य रिसायकलर आहेत. याची उभारणी पीपीपी मॉडेलवर आधारीत आहे, शून्य प्रदूषण करणारे वाहनाचे रिसायकलिंग करणे यावर त्यांच्यातर्फे लक्ष केंद्रीत करण्यात येते. ग्रेटर नोएडा, पुणे आणि चेन्नई येथे आधुनिक डिसमँटलिंग केंद्रे आहेत आणि मुंबई, बंगळुरू, अहमदाबाद, जयपूर आणि चंदीगड येथे संकलन केंद्रेत आहेत. त्याचप्रमाणे पुढील ८-१० महिन्यांमध्ये २५ शहरांमध्ये विस्तारीकरण करण्याची सेरोची योजना आहे. रेनोच्या सहयोगामुळे या कार्यक्रमाची व्याप्ती वाढेल आणि रेनो वाहन असलेल्या सर्व ग्राहकांचा आणि आपली जुनी वाहने स्क्रॅप करू इच्छिणाऱ्यांना फायदा होईल.”

जागतिक पातळीवर रेनो हे सर्वांसाठी शाश्वत मोबिलिटी उपलब्ध करून देण्याच्या उद्योगक्षेत्रात आद्य प्रवर्तक आणि आघाडीवर आहेत. ग्रुप रेनोने तीन लीडरशीप ध्येये निश्चित केली आहेत : इलेक्ट्रिक वाहने, चक्रीय अर्थव्यवस्था आणि नवीन गतिशीलता. २००५ पासून ग्रुप रेनो त्यांच्या वाहनांचा त्यांच्या कार्यकाळात पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यास प्रतिबद्ध आहे (त्यांचे आयुर्मान संपेपर्यंत निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल मिळवेपर्यंत).

  • ग्राहकांना गाडी स्क्रॅप करण्यासाठी सुरळीत माध्यम उपलब्ध करून देणारा आणि नव्या R. E. L. I. V. E (रेनो एंड ऑफ लाइफ व्हेइकल एलिमिनेशन) प्रोग्रॅमच्या माध्यमातून नवीन, अधिक सक्षम आणि सुरक्षित वाहनांचा लाभ देणारा प्रवासी कार सेगमेंटमधील पहिला ऑटोमोटिव्ह ब्रँड
  • आपली जुनी कार स्क्रॅप करून नवीन रेनो वाहन खरेदी करणाऱ्याला न्याय्य स्क्रॅप मूल्यांकन किंमत आणि खात्रीशीर लाभ ऑफर करून नव्या स्क्रॅपेज धोरणाला पाठिंबा देते