Renault launches Kwid Neotech Edition
रेनो’च्या वतीने क्विड निओटेक एडिशन बाजारात दाखल

ग्राहकांना दोन प्रकारच्या रंगसंगती – झंस्कार ब्ल्यू बॉडीसोबत सिल्व्हर रुफ आणि सिल्व्हर बॉडीसोबत झंस्कार ब्ल्यू रुफसमवेत मिळणार आहे. या नवीन उत्पादनाची किंमत केवळ रु. ३० हजारांनी वाढली असून क्विड निओटेक योग्य किंमतीत उत्तम खरेदीची संधी देऊ करते. याद्वारे अधिकाधिक ग्राहक फायदा आणि सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्ये देऊ करण्यात येतात.

  • गेम चेंजर उत्पादनाच्या वतीने आकर्षक, नाविन्यपूर्ण आणि किफायतशीर प्रस्ताव
  • केवळ ३० हजारांची वाढ करत खरेदीचे समाधान देणारे उत्पादन सादर

मुंबई : रेनो इंडियाच्या (Renault India) वतीने 2020 निओटेक एडिशनच्या लाँचची घोषणा करण्यात आली. क्विड’ (KWID) कडून उपलब्ध झालेले हे उत्पादन 0.8L एमटी, 1.0L एमटी आणि 1.0 एल एएमटी प्रकारात बाजारात आले आहे. ही मर्यादित स्वरुपातील आवृत्ती सेगमेंटमधील अशा प्रकारच्या पहिल्या-वहिल्या स्टाईलिश आणि दोन रंगसंगतीमधील ताज्या अंतर्गत सजावटीसह उपलब्ध झाली आहे.

ग्राहकांना दोन प्रकारच्या रंगसंगती – झंस्कार ब्ल्यू बॉडीसोबत सिल्व्हर रुफ आणि सिल्व्हर बॉडीसोबत झंस्कार ब्ल्यू रुफसमवेत मिळणार आहे. या नवीन उत्पादनाची किंमत केवळ रु. ३० हजारांनी वाढली असून क्विड निओटेक योग्य किंमतीत उत्तम खरेदीची संधी देऊ करते. याद्वारे अधिकाधिक ग्राहक फायदा आणि सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्ये देऊ करण्यात येतात.

2020 क्विड निओटेकक्विड निओटेकमधील अंतर्गत तरुण तडफदार सजावटीद्वारे 8” टच स्क्रीन युएलसी समवेत ॲपल कार प्ले, अँड्रॉईड ऑटो, फ्रँट पॅसेंजरकरिता युएसबी सॉकेट, फ्लेक्स व्हील्स, सी-पिलरवर 3 डी डीकॅल्स, निओटेक डोअर क्लाडिंग्ज, निळे इन्सर्ट आणि निळ्या शिवणीसह सीट कापडात बदल, क्रोम एएमटी डायल, क्रोम ॲड-ऑन ग्रील आणि बी-पिलर ब्लॅक टॅपिंग वैशिष्ट्ये क्विडच्या खेळकर रुबाबात भर टाकणारी आहेत.

रेनो कायमच नाविन्यतेवर भर देत मार्गक्रमणा करत असून त्यांनी क्विड श्रेणीत काही ताजे आणि समकालिन बदल घडवत ग्राहकांच्या विकसीत होणाऱ्या गरजांनुरूप सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. रेनोकडून क्विडमध्ये नेहमीच आधुनिक डिझाईन व सुलभ वैशिष्ट्ये देऊ करण्यात येतात.

2019 दरम्यान रेनो इंडियाने सर्वार्थाने नवीन-तडफदार, अधिक स्टाईलिश क्विड उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये अनेक पहिल्या दर्जाची वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. आधुनिक आरएक्सएल 1.0L वेरियंट क्विड श्रेणीला ग्राहकांसाठी जास्तीत-जास्त सुलभ बनवते. बाजारात दाखल होणारे 1.0 एल पॉवरट्रेनमधील नवीन आरएक्सएल वेरीयंट दोन्ही एमटी आणि एएमटी आवृत्तींमध्ये उपलब्ध आहे.

आकर्षक, नाविन्यपूर्ण आणि किफायतशीर एसयुव्ही प्रेरीत रेनो क्विड एक गेम चेंजर म्हणून उदयाला आली आहे. भारतातील रेनो व्हॉल्यूम ड्रायव्हर ठरली. क्विडने सेगमेंटमधील परवडणारी किंमत कायम ठेवत समकालिन एसयुव्ही-प्रेरीत डिझाईन भाषा, सर्वोत्तम वैशिष्ट्ये आणि किफायतशीर किंमतीला प्राधान्य दिले आहे. ज्यामुळे त्याचा लोकलायजेशन स्तर 98%ने वधारला आहे. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’ अधिक बळकट झाला आहे.

क्विडकडून उपलब्ध साधन-सुविधा आणि वैशिष्ट्ये, यामुळे सेगमेंटची व्याख्या नव्याने रचली गेली आहे. यामध्ये 20.32 सेमी टचस्क्रीन मीडियानाव्ह इवोल्यूशन, फर्स्ट-इन-क्लास एलईडी डिजीटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्लोअर कन्सोल माउंटेड एएमटी डायल, वन-टच लेन चेंज इंडिकेटर, वेगावर आधारीत व्हॉल्यूम कंट्रोल आणि 279 लिटर्सची बूट क्षमता आहे.

अल्प दरात मालकीच्या वचनाचा भाग म्हणून रेनोकडून 5 वर्षांपर्यंत पर्यायी विस्तारीत वॉरंटी आणि वाहन डिलिव्हरी तारखेपासून 100,000 किमी देऊ करण्यात येत आहेत. त्याशिवाय रेनो इझी केअरसारख्या अन्य ऑफर, प्रीपेड मेंटेनन्स प्रोग्राम खात्रीशीर मूल्य बचतीची हमी देतात. या सुविधांमुळे ग्राहकांना अद्वितीय ब्रँड मालकी अनुभवाची मजा घेणे शक्य होते. शिवाय, मन:शांती लाभते.

क्विड निओटेक एडिशन आणि रेनो क्विड रेंज 2020

नाव

प्रकार

 किंमत (एक्स-शोरूम, नवी दिल्ली)

रेनो क्विड एसटीडी पेट्रोल एमटी 0.8 एल 2,99,800 ₹
रेनो क्विड आरएक्सई पेट्रोल एमटी 0.8 एल 3,69,800 ₹
रेनो क्विड आरएक्सएल पेट्रोल एमटी 0.8 एल 3,99,800 ₹
रेनो क्विड निओटेक पेट्रोल एमटी 0.8 L  4,29,800₹
रेनो क्विड आरएक्सटी पेट्रोल एमटी 0.8 L 4,29,800 ₹
रेनो क्विड आरएक्सएल पेट्रोल एमटी 1.0 L 4,21,800 ₹
रेनो क्विड निओटेक पेट्रोल एमटी 1.0 Sce 4,51,800 ₹
रेनो क्विड आरएक्सटी ऑप्शन पेट्रोल एमटी 1.0 Sce 4,59,500 ₹
रेनो क्विड क्लाएम्बर ऑप्शन पेट्रोल एमटी 1.0 Sce  4,80,700 ₹
रेनो क्विड आरएक्सएल पेट्रोल इझी -आर 1.0 L 4,53,800 ₹
रेनो क्विड निओटेक पेट्रोल इझी – R 1.0 Sce 4,83,800 ₹
रेनो क्विड आरएक्सटी ऑप्शन पेट्रोल इझी –आर 1.0 Sce 4,91,500 ₹
रेनो क्विड क्लाएम्बर ऑप्शन पेट्रोल इझी – आर 1.0 Sce 5,12,700 ₹