रेनॉ आपल्या मेक इन इंडियाच्या वचनाला जागली; नेपाळला कायगरची निर्यात सुरू

१२२ रेनॉ कायगर कार्सची पहिली बॅच नेपाळमधील रेनॉच्या १५ विक्री आऊटलेट्सना पोहोचण्यासाठी पाठवण्यात आली आहे. लवकरच सार्क प्रदेशातील इतर देशांमध्ये कायगरच्या निर्यातीचा विस्तार केला जाईल.

  मुंबई : रेनॉ इंडियाने आपल्या सब-४ मीटर आटोपशीर एसयुव्ही रेनॉ कायगरची नेपाळला निर्यात सुरू केली आहे. रेनॉ कायगर ही रेनॉने भारतात स्थापित केलेल्या क्रांतीकारक उत्पादनांमधील सर्वांत अद्ययावत असून त्यांनी एक स्टनिंग, स्मार्ट आणि स्पोर्टी बी-एसयूव्ही म्हणून स्वतःला स्थापित केले आहे.

  ही नवीन रेनॉ कायगर नेपाळमध्ये रेनॉच्या वितरक- अ‍ॅडव्हान्स्ड ऑटोमोबाइल्स प्रा. लि. या नेपाळमधील सर्वांत मोठ्या समूहांपैकी एका विशाल ग्रुपच्या भाग असलेल्या वितरकाद्वारे दिली जाईल. ही गाडी देशातील १५ विक्री आऊटलेट्समध्ये उपलब्ध असेल. तिच्या टेस्ट ड्राइव्हच्या सुविधाही शोरूम्समध्ये उपलब्ध असतील.

  रेनॉ इंडिया ऑपरेशन्सचे राष्ट्रीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक वेंकटराम मामीलापल्ले म्हणाले की, “भारतात यशस्वीरित्या अनावरण केल्यानंतर रेनॉ कायगरने स्वतःला एक उत्तम उत्पादन म्हणून स्थापित केले आहे आणि कारला ग्राहकांच्या मोठ्या वर्गात स्वीकारले गेले आहे. कायगरमध्ये रेनॉमधील सर्वोत्तम गोष्टी आहेत- नावीन्यपूर्ण कार्समधील आमचे ज्ञान आणि ग्राहकांच्या गरजांची सखोल माहिती. कायगरच्या निर्यातीला सुरूवात झाल्यामुळे रेनॉच्या मेक इन इंडियाच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा पार झाला आहे. त्यांनी भारताचा डिझाइन, अभियांत्रिकी आणि उत्पादनांच्या क्षेत्रातील क्षमता स्पष्ट झाल्या आहेत. आम्ही हा वाढीचा वेग कायम ठेवू आणि सार्क प्रदेशातील इतर देशांमध्ये कायगरची निर्यात वाढवू आणि त्याचबरोबर भारतातही कायगरच्या कुटुंबाची वाढ करू.”

  रेनॉ कायगरची रचना विविध प्रकारच्या स्पोर्टी आणि मस्क्युलाइन घटकांनी केली असून ती एक खरी एसयुव्ही ठरली आहे. आतील बाजूस रेनॉ कायगरच्या स्मार्ट केबिनमध्ये तंत्रज्ञान, कार्यक्षमता आणि भरपूर जागा आहे. रेनॉ कायगरला टर्बोचार्ज्ड १.० लिटर पेट्रोल इंजिनाने ऊर्जा मिळाली आहे. त्यातून उत्तम कामगिरी आणि ड्रायव्हिंगचा आनंद मिळतो.

  या इंजिनाची तपासणी विश्वासार्हता आणि टिकाऊपणा यांच्यासाठी केली गेली असून त्यात रेनॉच्या जागतिक रेंजमध्ये आधीपासून अस्तित्त्वात असलेल्या अद्ययावत तंत्रज्ञान नवप्रवर्तनेही दिली गेली आहेत. ही उच्च कामगिरी, आधुनिक आणि कार्यक्षम इंजिन यांच्यामुळे स्पोर्टी ड्राइव्हची खात्री मिळेल आणि त्याला मल्टी सेन्स ड्राइव्ह मोड्सचा आधार मिळेल. त्यातून ग्राहकाच्या वाहन चालवण्याच्या प्राधान्यांना सुयोग्य ठरेल, अशी लवचिकताही मिळू शकेल.

  रेनॉ कायगर ही गाडी दोन इंजिन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. १.० लिटर ऊर्जा आणि १.० लिटर टर्बो त्यातील २ पेडलच्या पर्यायांसोबत जे प्रत्येक इंजिनावर लावलेले आहे. ग्राहकांना चार वेगवेगळ्या ट्रिम्समधून निवड करता येईल-आरएक्सई, आरएक्सएल, आरएक्सटी आणि आरएक्सझेड. प्रत्येक आवृत्तीची रचना ग्राहकांच्या गरजा आणि विभागाच्या आवश्यकता लक्षात घेऊन करण्यात आली आहे आणि सर्व ट्रिम्समध्ये त्यांची किंमतही आकर्षक आहे. ग्राहकांना प्रत्येक टप्प्यावर अमूल्य फायदा मिळेल आणि त्यांना स्टायलिश ड्युएल टोन कॉम्बिनेशन्सचा पर्यायही निवडता येईल. तो या सर्व श्रेणींमध्ये उपलब्ध आहे.

  रेनॉ कायगरची रचना फ्रान्स आणि भारतातील टीम्सच्या भागीदारीत केली गेली आहे. ती भारतीय ग्राहकांसाठी आधी भारतात विकसित व उत्पादित केली आहे आणि नंतर जगभरात पोहोचवली जाईल.

  रेनॉ आपल्या उत्पादन विस्ताराच्या धोरणासह भारतात मोठ्या प्रमाणावर गाड्या देण्याच्या योजनेद्वारे भारतात आपली नेटवर्कची पोहोच वाढवत आहे आणि ग्राहकांना रेनॉ ब्रँडसोबत अभूतपूर्व पद्धतीने जोडले जाता येईल, याची खात्री करण्यासाठी अनेक विशेष आणि नवनवीन उपक्रम हाती घेत आहे. सध्या रेनॉ इंडियाचे भारतात ५०० पेक्षा जास्त विक्री आणि सेवा टचपॉइंट्स आहेत आणि त्यात २०० पेक्षा जास्त वर्कशॉप ऑन व्हील्स लोकेशन्सचा देशभरात समावेश आहे.

  Renault lived up to its promise of Make in India Export of kigar to Nepal resumes