नव्या आणि अद्ययावत वैशिष्ट्यांसह रेनो इंडियाची माय21 ट्रायबर भारतात दाखल

भारतातील रेनो गट आणि फ्रान्स यांच्यातील एकत्रित प्रकल्पाचे फलित म्हणून, खास करून भारतीय बाजारातील नाविन्यपूर्ण उत्पादनाच्या संधी लक्षात ठेवूनच रेनो ट्रायबरची रचना करण्यात आली.  ज्या ग्राहकांना चार मीटरपेक्षा लहान कार हवी आहे त्यांच्यासाठी रेनो ट्रायबर अतुलनीय मूल्य देऊ करते.

  मुंबई : ट्रायबर या क्रांतिकारी उत्पादन निर्मितीच्या यशावर ठाम राहण्याची आपली वचनबद्धता पूर्ण करत रेनो इंडियाने 5.30 लाख रुपये अशा आकर्षक आणि अतुलनीय किमतीमध्ये संपूर्ण-नवी रेनो ट्रायबर माय21 बाजारात दाखल केली आहे.  ऑगस्ट 2019 मध्ये रेनो ट्रायबर हे अतिशय प्रशस्त, अल्ट्रा-मॉड्यूलर वाहन बाजारात दाखल झाले.  भारतात 75,000 समाधानी ग्राहक निर्माण झाल्याने रेनोसाठी हे अत्यंत क्रांतिकारी उत्पादन ठरले आहे.

  भारतातील रेनो गट आणि फ्रान्स यांच्यातील एकत्रित प्रकल्पाचे फलित म्हणून, खास करून भारतीय बाजारातील नाविन्यपूर्ण उत्पादनाच्या संधी लक्षात ठेवूनच रेनो ट्रायबरची रचना करण्यात आली.  ज्या ग्राहकांना चार मीटरपेक्षा लहान कार हवी आहे त्यांच्यासाठी रेनो ट्रायबर अतुलनीय मूल्य देऊ करते. गेल्या वर्षी इझी-आर एएमटीच्या पर्यायानंतर लवचिक, आकर्षक आणि किफायतशीर किमतीमुळे ट्रायबरच्या युएसपीमध्ये वाढ झाली आहे.

  अत्याधुनिक वैशिष्ट्ये असणारी संपूर्ण नवी ट्रायबर माय21 हे जास्त मूल्य आणि अतिशय लवचिक, जास्त आकर्षक आणि तरीही किफायतशीर असणारे, नाविन्यपूर्णता आणि आधुनिकतेच्या दृष्टीने एक क्रांतिकारी उत्पादन ठरले आहे.  प्रवाशांसाठी वाढीव आराम देऊ करणाऱ्या रेनो ट्रायबरमध्ये आता स्टिअरिंग व्हीलवर ऑडियो आणि फोन कंट्रोल्स असल्याने आणि उंची बदलता येणारी ड्रायव्हर सीट यात देण्यात आल्याने कारच्या लवचिकतेमध्ये वाढ झाली आहे.  संपूर्ण नव्या ट्रायबरमधील सर्व रंग पर्यायांमध्ये ड्युअल टोन बाह्यांग, कारचा नवा सीडर ब्राऊन रंग आणि ओआरव्हीएमवरील एलईडी टर्न इंडिकेटर यामुळे कारच्या आकर्षकतेमध्ये भर पडली आहे. व्यावहारिकता आणि किफायतशीरपणा या दृष्टीने रेनो ट्रायबर ही ह्या विभागातील सर्वात किफायतशीर एएमटी असून तिचा देखभाल खर्च हा अतिशय कमी असल्याने ग्राहकांना त्यांच्या पैशांचा संपूर्ण मोबदला मिळतो.

  आकर्षक रचना, मजबूती आणि बहुआयामी वाहन असणाऱ्या रेनो ट्रायबरमध्ये चार मीटरपेक्षा कमी जागेत एक ते सात प्रौढ अतिशय आरामशीरपणे सामावू शकतात.  भारतातील ग्राहकांच्या अपेक्षांचा संपूर्ण अभ्यास करूनच रेनो ट्रायबरची निर्मिती करण्यात आली असल्याने ती अतुलनीय लवचिकता देऊ करते.  प्रत्येक ओळीत रेनो ट्रायबरमध्ये बसण्यासाठी भरपूर जागा देण्यात आली आहे आणि त्यात 625एल बूट स्पेस आहे.  पाच-सीटर रचनेतील या विभागातील ही सर्वात जास्त बूट क्षमता आहे.  सर्वोत्कृष्ट सुरक्षा वैशिष्ट्यांसह रेनो ट्रायबरची निर्मिती करण्यात आली असून यात दर्जेदार चार एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत.

  रेनो ट्रायबरने स्वत:ला यशस्वी उत्पादन असल्याचे सिद्ध केले आहे आणि कार खरेदीदारांच्या श्रेणीने तिला मोठ्या प्रमाणात स्वीकारले आहे.  भारतात ट्रायबर समूहाचा विस्तार करत असतानाच, रेनोने दक्षिण आफ्रिका आणि सार्क प्रदेशात ट्रायबरची निर्यात सुरू केली आहे आणि आफ्रिकेतील तसेच सार्क प्रदेशातील इतर भागात देखील ट्रायबरची निर्यात वाढविण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

  रेनो ट्रायबर माय21 ही https://renault.co.in या संकेतस्थळावरून, माय रेनो ॲपवरून ऑनलाईन किंवा रेनोच्या अधिकृत वितरकाकडून नाममात्र 11,000 रुपये भरून बुक करता येणार आहे. सीएससी ग्रामीण ईस्टोअरवर ट्रायबर सूचीबद्ध केली जाणार आहे आणि महत्त्वाकांक्षी अशा ग्रामीण स्तरावरील उद्योजकांच्या (व्हीएलईज) माध्यमातून अंतर्गत प्रदेशातील संभाव्य ग्राहकांना ती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

  संपूर्ण नवी रेनो ट्रायबर माय21 ही चार प्रकारात उपलब्ध असणार आहे- आरएक्सई, आरएक्सएल,आरएक्सटी आणि आरएक्सझेड आणि यात एमटी आणि इझी-आर एएमटी असे दोन्ही पर्याय उपलब्ध असणार आहेत. ग्राहकांच्या आवश्यकता आणि या विभागातील गरजा लक्षात घेऊनच प्रत्येक प्रकारची निर्मिती करण्यात आली असून प्रत्येक प्रकाराची किंमत ही आकर्षक ठेवण्यात आली आहे.

  रेनो ट्रायबर माय21 ही पाच आकर्षक रंगात उपलब्ध असेल. मेटल मस्टर्ड, इलेक्ट्रिक ब्ल्यू, मूनलाईट सिल्व्हर, आईस कूल व्हाईट आणि सीडर ब्राऊन.  आरएक्सझेड प्रकारात संपूर्ण गाडीच्या रंगामध्ये ड्युअल टोन पर्याय उपलब्ध असणार आहेत.

  2021 रेनो ट्रायबर किंमत (सर्व किमती भारतीय मूल्यात लाखात, संपूर्ण भारतात एकच किंमत)

  प्रकार

  एमटी

  इझी-आर एएमटी

  आरएक्सई 5.30
  आरएक्सएल 5.99 6.50
  आरएक्सटी 6.55 7.05
  आरएक्सझेड 7.15 7.65

  ड्युअल टोन किंमत अतिरिक्त : 17,000 रुपये (आरएक्सझेड प्रकारावर सर्व बाह्य रंगात उपलब्ध)

  • 75,000 पेक्षा जास्त समाधानी ग्राहक असणारे रेनो ट्रायबर हे भारतातील रेनोचे प्रमुख आणि अतिशय प्रशस्त व अल्ट्रा मॉड्यूलर मॉडेल
  • पूर्णपणे नवी माय21 ट्रायबर 5.30 लाख रुपयांत भारतीय बाजारात उपलब्ध
  • नवी अद्ययावत रेनो ट्रायबर ही नव्या रुपात आणि नव्या वैशिष्ट्यांसह जास्त लवचिक आणि जास्त आकर्षक झाली आहे-
   • स्टीअरिंग व्हील माउंटेड ऑडियो आणि फोन कंट्रोल्स
   • उंची कमी-जास्त करता येईल अशी ड्रायव्हर सीट
   • सर्व रंग पर्यायांमध्ये विभागातील सर्वोत्कृष्ट ड्युअल टोन बाह्यांग,
   • नव्या रंगातील बाह्यांग- सीडर ब्राऊन
   • ओआरव्हीएमवरील एलईडी टर्न इंडिकेटर
  • गेल्या वर्षी बाजारात दाखल झालेल्या रेनो ट्रायबर इझी-आर एएमटीने ट्रायबरची महत्त्वाची युएसपी बळकट करून तिला एएमटी विभागात सर्वात किफायतशीर केले
  • रेनो ट्रायबरने आपली अद्वितीय गुणवत्ता, मॉड्यूलॅरिटी, आकर्षक रचना आणि अत्याधुनिक वैशिष्ट्ये तसेच उत्कृष्ट दर्जाच्या पॅकेजिंगच्या बळावर ग्राहकांसोबत एक बळकट नाते निर्माण केले