क्रांतिकारी संशोधन : आता वाहन पेट्रोल पंपावर नेण्याची गरज नाही उत्तम ग्रुपतर्फे फिरते ‘अश्वथ’ सीएनजी युनिट दाखल

हे केंद्र सीएनजी भरणा करण्यासाठी कोणत्याही ठराविक ठिकाणी उभे करता येते आणि त्यामुळे गाड्यांना सीएनजी अगदी कोणत्याही ठिकाणी उपलब्ध करून देणे शक्य होते.

  मुंबई : उत्तम ग्रुप ऑफ कंपनीजने महानगर गॅस लिमिटेड (MGM)बरोबर सहकार्य करार करत ‘अश्वथ’ हे एकात्मिक सीएनजी पुनर्भरण युनिट आज दाखल केले. त्याचा वापर सीएनजी इंधन गाडीमध्ये सहजपणे भरण्यासाठी होतो. ‘अश्वथ’ हे एकमेवाद्वितीय असे मोबाईल रिफ्युएलिंग युनिट (MRU) असून ते चालत्या ट्रकवर बसविले जाणारे अत्यंत नेटके असे इंधन भरणा केंद्र आहे.

  हे केंद्र सीएनजी भरणा करण्यासाठी कोणत्याही ठराविक ठिकाणी उभे करता येते आणि त्यामुळे गाड्यांना सीएनजी अगदी कोणत्याही ठिकाणी उपलब्ध करून देणे शक्य होते. ‘एमआरयू’चे उद्घाटन केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू व स्टील मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले.

  भारतीय ऊर्जा बाजारपेठेत गॅस आधारित इंधनाचा वापर सध्याच्या ६.५ टक्केवरून १५ टक्केपर्यंत वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे अशा प्रकारची यंत्रणा निर्माण करणे गरजेचे झाले आहे. सरकारने या उद्योगाला अशा प्रकारची यंत्रणा निर्माण करण्याच्या सूचना केल्या आहेत की ज्यामुळे सीएनजी अगदी सहजपणे उपलब्ध होवू शकेल. त्याचप्रमाणे कमी खर्चात सीएनजीचा पाया भव्य प्रमाणात विस्तारेल, असेही उद्दिष्ट त्यामागे आहे. ‘अश्वथ’ हे त्या दृष्टीने टाकलेले एक पाऊल आहे.

  मोबाईल पुनर्भरण युनिटमध्ये कार्यक्षम आणि किफायतशीरदृष्ट्या उपलब्धतेच्या समस्येवर मात करण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्या वाहनांना प्रत्येकवेळी इंधन भरण्यासाठी पंपामध्ये येण्याची गरज पडणार नाही तर त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना इंधन भरण्याची सुविधा प्राप्त होवू शकते. कंपनीने विकसित केलेल्या ‘अश्वथ’ एमआरयूची सर्वसाधारण क्षमता ही ८८०० लिटर डब्ल्यू सी स्टोरेज कॅस्केड एवढी असून या यंत्रणेमध्ये अत्याधुनिक अशी सुरक्षा यंत्रणा बसविली गेली आहे. त्यांत टीपीआरडी (थर्मली ॲक्टिव्हेटेड प्रेशर रिलीफ डिव्हाईस) असून त्याद्वारे सिलिंडरमधून उच्च दाबावर वायू सोडणे शक्य होते.

  या शुभारंभाबद्दल बोलताना उत्तम ग्रुप ऑफ कंपनीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी करण भाटीया म्हणाले, “शहरी आणि ग्रामीण भारतामध्ये पायाभूत सुविधा उभारण्यामधील जी आव्हाने आहेत, ती दूर करण्याचे काम यांसारखी यंत्रणा करते आणि त्याद्वारे सर्वसामान्यांना इंधन उपलब्ध करून दिले जाते. ऊर्जा उद्योगामध्ये हे एमआरयू फार मोठा बदल घडवून आणतील. भारतात तब्बल ७०,००० पेट्रोल पंप असून त्यातील केवळ ३००० पंप हे सीएनजी स्टेशन म्हणून कार्यरत आहेत. त्यातील बहुतेक हे दिल्ली आणि मुंबई यांसारख्या शहरांमध्ये आहेत. सरकारने ही संख्या २० पटीने वाढविण्याचे ठरवले आहे. नवीन इंधन स्टेशन उभे करणे हे खूप आव्हानात्मक असते आणि त्यासाठी तब्बल १५ ते २० कोटी रुपयांचे भांडवल गुंतवावे लागते. त्याशिवाय योग्य ठिकाणी जागा उपलब्ध होणे, हेसुद्धा एक मोठे आव्हान असते. पण एक ‘एमआरयू’ या सर्व गोष्टींवर मात करू शकते आणि त्यासाठी अगदी कमी खर्च येतो. ‘एमआरयू’ यंत्र हे उच्च सीएनजी वाहन क्षमतेने उपलब्ध असून त्यात एकावेळी ३०० ते ४०० वाहने भरण्याची क्षमता आहे. त्याअर्थी ही यंत्रणा क्रांतिकारी आहे.”

  मोबाईल भरणा केंद्र अर्थात मोबाईल रिफ्युएलींग युनिटचे उद्घाटन करताना मला अतिशय आनंद होत आहे. हे भारताच्या नैसर्गिक वायू विकास आणि नाविन्यपूर्ण सेवा या क्षेत्रातील हे एक मोठे पाऊल आहे. आमचे ध्येय विविध ठिकाणी या सेवा देत त्या सहजपणे उपलब्ध करून देणे आणि ग्राहकांना त्या किफायतशीर किमतीत प्राप्त करून देणे हे आहे.

  धर्मेंद्र प्रधान, मंत्री, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि स्टील मंत्रालय, भारत सरकार

  Revolutionary research No need to drive at petrol pump now Uttam Group launches Ashwath CNG On Road Mobile refueling unit