Pulsar ते Avenger, बजाज ऑटोकडून बाईक्सच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या

Pulsar 150 Dagger Edge एडिशन पर्ल व्हाईट आणि सफायर ब्लू कलर या दोन कलर स्कीम्समध्ये सादर करण्यात आली आहे. यापूर्वी मडगार्ड आणि रिमवर रेड हायलाइट देण्यात आला होता, आताच्या Dagger Edge एडिशनमधील बाईक्सच्या मडगार्ड आणि रिमवर व्हाईट हायलाइट कलर देण्यात आला आहे.

    बजाज ऑटोने (Bajaj Auto) आपल्या पल्सर, अ‍ॅव्हेंजर आणि डॉमिनर बाईकच्या किंमतीत बदल केला आहे. यात कंपनीने Pulsar 180 Dagger Edition ची किंमतसुद्धा वाढवली ​​आहे.

    Pulsar 150 Dagger Edge एडिशन पर्ल व्हाईट आणि सफायर ब्लू कलर या दोन कलर स्कीम्समध्ये सादर करण्यात आली आहे. यापूर्वी मडगार्ड आणि रिमवर रेड हायलाइट देण्यात आला होता, आताच्या Dagger Edge एडिशनमधील बाईक्सच्या मडगार्ड आणि रिमवर व्हाईट हायलाइट कलर देण्यात आला आहे.

    नवीन पेंट स्कीमव्यतिरिक्त यामध्ये इतर कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. यात 149.5 सीसी फोर-स्ट्रोक इंजिन आहे जे 8,500 आरपीएम वर 13.8bhp ची मॅक्सिमम पॉवर आणि 6500 आरपीएम वर पीक टॉर्क जनरेट करते.

    कंपनीने Pulsar 180 Dagger Edition या बाईकशिवाय पल्सर NS160, NS200, RS200, Avenger Street 160 आणि Avenger Cruise 220 च्या किंमतीत वाढ केली आहे. पल्सर एनएस 160 ची किंमत 2000 रुपयांनी वाढवली असून आता या बाईकची किंमत 1.12 लाख रुपयांवर गेली आहे.