‘या’ कंपनीने लॉन्च केलेली कार ठरली जगातील सर्वात महागडी कार ; काय आहेत या कारची वैशिष्ट्ये, जाणून घ्या

 स्वित्झर्लंडची प्रसिद्ध कंपनी House of Bovet कारचे मालक (पती आणि पत्नी) यांच्यासाठी खास बांधण्यात आली आहे. या व्यतिरिक्त या कारचे एक उत्तम वैशिष्ट्य म्हणजे ती हलकी आणि पातळ स्टीयरिंग व्हीलची आहे. या कारची किंमत ऐकून धक्काच बसेल. 200 कोटी रुपये इतकी किंमत असल्याने या कारमध्ये आहे तरी काय, असा प्रश्न उपस्थित होतो.

    मुंबई : रोल्स रॉयस (Rolls-Royce) आपल्या महागड्या लिमोझिन कारच्या किंमतीसाठी आधीच जगभरात प्रसिद्ध आहे, परंतु आता या कंपनीने लॉन्च केलेली कार जगातील सर्वात महागडी कार  ठरली आहे. बोट टेल (Boat Tail) असे या कारचे नाव असून ते 13 दशलक्ष डॉलर्स रोल्स-रॉयस स्वेप टेलने प्रेरित आहेत. आतापर्यंत ही स्‍वेप टेल ही रोल्स रॉयसची सर्वात महागडी कार होती.

    स्वित्झर्लंडची प्रसिद्ध कंपनी House of Bovet कारचे मालक (पती आणि पत्नी) यांच्यासाठी खास बांधण्यात आली आहे. या व्यतिरिक्त या कारचे एक उत्तम वैशिष्ट्य म्हणजे ती हलकी आणि पातळ स्टीयरिंग व्हीलची आहे. या कारची किंमत ऐकून धक्काच बसेल. 200 कोटी रुपये इतकी किंमत असल्याने या कारमध्ये आहे तरी काय, असा प्रश्न उपस्थित होतो.

    या कारमध्ये शॅम्पेनसाठी स्वतंत्र कूलर आहे. हे दुहेरी शॅम्पेन कूलर (Champagne Cooler) विशेषतः कार मालकाची आवडती आर्मान्ड डी ब्रिग्नॅकच्या बाटल्या बसविण्यासाठी डिझाइन केलेले आहे.या कारची सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे हाताने रंगवलेला निळा बोनट. या व्यतिरिक्त या कारचा मागील भाग लक्झरी स्पीड बोट सारखा दिसत आहे