Royal Enfield ची बाजारात रॉयल एन्ट्री, नव्या फिचर्स आणि डिझाईनसह जबरदस्त लूक

Hunter 350 या बाईकच्या लाँचिंगबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु टेस्टिंगदरम्यान जेव्हा ही बाईक पाहायला मिळाली त्यावरुन असं कळतंय की, या बाईकमध्ये सेमी डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, अॅनालॉग स्पीडोमीटर आणि LCD देण्यात आली आहे.

    मुंबई : Royal Enfield कंपनी लवकरच भारतात पाच नव्या बाईक्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्यापैकी एक बाईक लाँचिंगसाठी पूर्णपणे सज्ज असून थोड्याच दिवसात ही बाईक लाँच केली जाऊ शकते. Royal Enfield ही कंपनी आता भारतात एक लोकप्रिय बँड बनला आहे. Royal Enfield कंपनी आता Hunter 350 ही बाईक बाजारात दाखल करण्याच्या तयारीत आहे. नुकीतच टेस्टिंगदरम्यान ही बाईक पाहायला मिळाली आहे.

    Hunter 350 या बाईकच्या लाँचिंगबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु टेस्टिंगदरम्यान जेव्हा ही बाईक पाहायला मिळाली त्यावरुन असं कळतंय की, या बाईकमध्ये सेमी डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, अॅनालॉग स्पीडोमीटर आणि LCD देण्यात आली आहे.

    या नव्या बाईकचं डिझाईन सध्याच्या Meteor 350 या बाईकशी मिळतंजुळतं आहे. या बाईकमध्ये कंपनीने रेट्रो स्टाईल राऊंड शेप हेडलाईट, वोलोमाइन फ्युल टँक, सिंगल पीस सीट, स्प्लीट ग्रॅब रेलचा समावेश करण्यात आला आहे. नवीन Hunter 350 बाईकच्या इंजिनबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 349cc क्षमते एवढं सिंगल सिलिंडरयुक्त इंजिन मिळणार आहे.