या ठिकाणी, जुन्या बाइक्स 12 ते 17 हजार रुपयांच्या श्रेणीत उपलब्ध आहेत, जाणून घ्या संपूर्ण तपशील

Droom च्या माध्यमातून बाइक खरेदी करू शकता. या ठिकाणी आपल्याला 12 ते 17 हजार रुपयांच्या रेंजमध्ये बाइक विकत घेता येईल. आपण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या पसंतीची बाइक शोधू शकता आणि सोबतच बजेटनुसार बाइकची निवड करू शकतात.

नवी दिल्ली : जुन्या बाइकचा बाजार गेल्या काही वर्षात मोठ्या वेगाने वाढतो आहे. नव्या बाइकच्या तुलनेत जुन्या बाइककडे अनेकांचा कल वाढताना दिसत आहे. याचं कारण असं आहे की, नवीन बाइकच्या तुलनेत जुनी बाइक खरेदी करणं कैक पटींनी फायदेशीर मानलं गेलं आहे.

जुनी बाइक अत्यंत माफक किंमतीत खरेदी करता येऊ शकते तर नवीन बाइक खरेदी करण्याच्या तुलनेत निश्चितच फायद्याचं मानलं जातं. तथापि जुनी बाइक विकत घेण्यापूर्वी लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. ग्राहकांच्या मनात सर्वात मोठा संभ्रम हा असतो की, जुन्या बाइक्स मिळतात तरी कुठे? हे असं का होतं कारणबाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत यामुळेच ग्राहकांच्या मनात संभ्रम असतो आणि ते निश्चित निर्णयापर्यंत पोहोचत नाहीत.

जर तुम्हीही अशाच प्रकारच्या संभ्रमात असाल तर droom च्या माध्यमातून बाइक खरेदी करू शकता. या ठिकाणी आपल्याला 12 ते 17 हजार रुपयांच्या रेंजमध्ये बाइक विकत घेता येईल. या प्लॅटफॉर्मच्या माध्यामातून आपल्याला आपल्या पसंतीची बाइक सर्च करू शकता आणि सोबतच बजेटनुसार बाइकची निवड करू शकतात.

1. Bajaj Pulsar 150cc:

या बाइकचं 2009 चं मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहे. बाइक पहिल्या मालकाकडून विकली गेली आहे. ही बाइक 61,377 हजार किलोमीटर चाललेली आहे. सोबतच ही 65 किलोमीटर प्रति लीटरचे मायलेज देते. यात 149सीसीचं इंजिन दिलेलं आहे. याची व्हील साइझ 17 इंच आहे. याची किंमत 14,200 रुपये ठेवण्यात आली आहे.

2. Honda CB Twister 110cc:

या बाइकचे 2012 चे मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहे. बाइक पहिल्या मालकाकडून विकली गेली आहे. ही बाइक 25,000 हजार किमी चाललेली आहे. सोबतच ही 71 किलो मीटर प्रतिलीटरचं मायलेज देते. यात 109 सीसीचं इंजिन दिलं आहे. याची व्हील साइझ 17 इंचाची आहे. याची किंमत 12,300 रुपये ठेवण्यात आली आहे.

3. Hero Ignitor Disc 125cc:

या बाइकचे 2012 चे मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहे. बाइक पहिल्याच मालकाकडून विक्री करण्यात येत आहे. ही बाइक 52,000 हजार किलोमीटर चाललेली आहे. यासोबतच ही 55 किलोमीटर प्रति लीटरचे मायलेज देते. यात 125 सीसीचं इंजिन दिलं आहे. याची व्हील साइझ 17 इंचाची आहे. याची किंमत 17,000 रुपये ठेवण्यात आली आहे.

नोट :

वर दिलेली Bikes शी संबंधित माहिती Droom वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार दिली आहे. या सर्व बाइक्स दिल्ली सर्कलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. जुनी बाइक विकत घेताना दस्ताऐवज आणि गाडीची कंडिशन स्वत: तपासून घ्यावी. वाहन मालकाची भेट घेतल्याशिवाय किंवा वाहनाची तपासणी केल्याशिवाय ऑनलाइन व्यवहार करू नये.