टाटा मोटर्सच्या ‘या’ गाडीचे रहस्य उलगडणार; किंमतीची प्रतिक्षा आज संपणार; जाणून घ्या तुमच्या स्वप्नातल्या ड्रिम कारविषयी

वाहनाच्या किंमतीची घोषणा आणि डिलीव्हरीची सुरुवात 22 फेब्रुवारीपासून होणार आहे. टाटा मोटर्स (Tata Motors) ने आपल्या पुणे स्थित कारखान्यात गेल्याच महिन्यात सफारीची पहिली गाडी तयार केली होती.

    टाटा मोटर्स (Tata Motors) ने गुरुवारी आपली खास एसयुव्ही (SUV) नवीन सफारीसाठी बुकिंग सुरू केली आहे, ज्याची डिलीव्हरी 22 फेब्रुवारीपासून सुरू होईल. नवीन प्रिमियम एसयुव्ही (Premium SUV) ऑनलाइन किंवा टाटा मोटर्स (Tata Motors) च्या अधिकृत डिलरशीपकडे 30,000 रुपये भरून बुकिंग करता येईल. बुकिंगची किंमत परत घेण्याचाही पर्याय ग्राहकांना देण्यात आला आहे.

    वाहनाच्या किंमतीची घोषणा आणि डिलीव्हरीची सुरुवात 22 फेब्रुवारीपासून होणार आहे. टाटा मोटर्स (Tata Motors) ने आपल्या पुणे स्थित कारखान्यात गेल्याच महिन्यात सफारीची पहिली गाडी तयार केली होती. प्रवासी वाहन विभागाचे अध्यक्ष शैलेश चंद्र म्हणाले, आजपासून सफारी आमच्या नेटवर्कमध्ये प्रदर्शन, टेस्ट ड्राइव्ह आणि बुकिंगसाठी उपलब्ध आहे.