एमजी मोटरने Hector चे ‘शाईन’ व्हेरिएंट केले लाँच ; नव्या इलेक्ट्रिक सनरुफसह सीव्हीटी, पेट्रोल एमटी आणि डिझेल एमटी ट्रान्समिशन पर्यायांमध्ये उपलब्ध

नव्या ट्रिममध्ये सर्वात नवे इलेक्ट्रिक सनरुफ(Electric Sunroof), १७-इंच अलॉय व्हील्स आणि २६.४ सेमी एचडी टचस्क्रीन एव्हीएन सिस्टिम, ॲपल कार प्लेसह (Apple Car Play) आणि अँड्रॉइड ऑटो या सुविधा आहेत. तसेच शाइन सीव्हीटीमध्ये इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, पुश बटण स्टार्ट / स्टॉप आणि स्मार्ट एंट्री, क्रोम डोअर हँडल आणि टेलिस्कोपिक स्टिअरिंग आदींची सुसज्जता आहे.

    मुंबई : हेक्टरच्या (Hector) दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त (Second Anniversary), एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) आज एमजी हेक्टरचे (MG Hector) ‘शाईन’ (Shine) व्हेरिएंट लाँच केले. पेट्रोल एमटी, डिझेल एमटी आणि पेट्रोल सीव्हीटी पर्यायांमध्ये उपलब्ध असलेल्या हेक्टर शाइनची किंमत १४.५१ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) सुरु होते.

    नव्या ट्रिममध्ये सर्वात नवे इलेक्ट्रिक सनरुफ(Electric Sunroof), १७-इंच अलॉय व्हील्स आणि २६.४ सेमी एचडी टचस्क्रीन एव्हीएन सिस्टिम, ॲपल कार प्लेसह (Apple Car Play) आणि अँड्रॉइड ऑटो या सुविधा आहेत. तसेच शाइन सीव्हीटीमध्ये इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, पुश बटण स्टार्ट / स्टॉप आणि स्मार्ट एंट्री, क्रोम डोअर हँडल आणि टेलिस्कोपिक स्टिअरिंग आदींची सुसज्जता आहे.

    एमजी मोटर इंडियाचे चीफ कमर्शिअल ऑफिसर गौरव गुप्ता म्हणाले, “हेक्टरचा भारतातील दुसरा वर्धापन दिन हे हेक्टरच्या पोर्टफोलिओला आणखी बळकटी देण्यासाठीचे उत्तम निमित्त आहे. शाइन व्हेरिएंटमुळे हेक्टर परिवार श्रेणीची शोभा वाढवते. यात पाच प्रकार असून ग्राहकांना निवड करण्याची शक्ती प्रदान करते. एमजीच्या कुटुंबात नव्या सदस्याचे स्वागत करण्याची ही एक संधी आहे.”

    तसेच, एमजी एक निवडक ॲक्सेसरीजचे पॅकेजदेखील प्रदान करत आहे, यात उच्च सौंदर्यात्मक आणि कार्यक्षम मूल्य असलेल्या गोष्टी असतील. जसे की, लेदरेट सीट कव्हर्स आणि स्टीअरिंग व्हील कव्हर, विंडो सनशेड्स, एअर प्युरिफायर, वायरलेस फोन चार्जिंग आणि थ्री डी केबिन मॅट्स आकर्षक किंमतीच्या ऑफरवर असतील. या कारला एमजी शील्ड इन्शुरन्सदेखील असेल. याअंतर्गत ५-५-५ ऑफर तसेच पाच वर्षांची अमर्याद किलोमीटरची वॉरंटी, पाच वर्षांचे रोडसाइड असिस्टन्स आणि पाच वर्षांची लेबर फ्री सर्व्हिस यांचा समावेश आहे.

    Shine variant of Hector launches by MG Motor Available in CVT Petrol MT and Diesel MT transmission options with new electric sunroof