या आहेत कारवरील डेंट काढण्यासाठी सोप्या ट्रिक्स; एकदा ट्राय करून पाहाच

ही पद्धत तुमच्या कारचा डेंट काढण्यासाठी उपयोगी ठरु शकते. तसेच एखादा मोठा डेंट कारवर असेल तर एका मोठ्या भांड्यात 1 ते 2 लीटर पाणी गरम करून ते डेंटवर टाका. त्यानंतर थोडा दबाव टाकल्याने कारची बॉडी आधीसारखी होण्यास मदत होईल. पण लक्षात ठेवा पाणी अधिक गरम नसले पाहिजे.

    जर तुम्ही कार खरेदी केली असेल आणि कधी त्यावर डेंट (Dent) आला असेल तर ही सामान्य गोष्ट आहे. कारण कारच्या बॉडीवर एखादे वाहन आदळले तर त्यावर डेंट येणे सहाजिकच आहे. कारवर आलेला डेंट हा तुमच्या कारचा लूक खराब करू शकतो. त्यासाठी तुम्ही मॅकॅनिककडे जाऊन डेंट काढण्यासाठी जाता. या गोष्टीसाठी तुम्हाला हजारो रुपये खर्चसुद्धा करावा लागतो. परंतु अगदी सोप्या पद्धतीने आणि घरगुती उपायांनी तुम्ही तुमच्या कारचा डेंट काढू शकता. त्यासाठी तुम्हाला हजारो रुप सुद्धा खर्च करावे लागणार नाही आहेत.

    गरम पाणी

    गरम पाणी हे कोणताही धातू पसरविण्याचे काम करतो. त्यामुळे जर तुम्ही गरम पाणी थेट मेटल प्लेटवर टाकलात तर त्याची लांबी आणि रुंदी थोडी वाढू शकते. ही पद्धत तुमच्या कारचा डेंट काढण्यासाठी उपयोगी ठरु शकते. तसेच एखादा मोठा डेंट कारवर असेल तर एका मोठ्या भांड्यात 1 ते 2 लीटर पाणी गरम करून ते डेंटवर टाका. त्यानंतर थोडा दबाव टाकल्याने कारची बॉडी आधीसारखी होण्यास मदत होईल. पण लक्षात ठेवा पाणी अधिक गरम नसले पाहिजे.

    ग्लू स्टिक

    ग्लू स्टिक गरम करून डेंट ठीक केला जाऊ शकतो. पण यासाठी तुम्हाला खूप ग्लू स्टिक घेऊन त्या डेंट असलेल्या ठिकाणी ठेवाव्या लागणार आहेत. एकदा का या स्टिक चिटकल्या जातील त्यानंतर त्या पाठच्या बाजूने बाहेर खेचून काढू शकता. यामुळे तुमच्या कारवर आलेला डेंट नीट होऊ शकतो.

    मास्किंग टेप

    मास्किंग टेप ही अत्यंत मजबूत असते. त्यामुळे याच्या मदतीने तुम्ही अगदी सहज डेंट काढू शकता. फक्त डेंटवर खूप मास्किंग टेप लावून नंतर त्या खेचाव्या लागणार आहेत.