स्कोडा ऑटो इंडियाने ऑक्टाव्हियाचे भारतातील उत्पादन केले सुरू

जानेवारी १९५९ मध्ये बोलेस्लाव्ह येतील म्लाडा येथील कारखान्यातून पहिली ऑक्टाव्हिया बाहेर पडली. कारच्या या मॉडेलचे नामकरण ‘ऑक्टाव्हिया’ या लॅटिन शब्दावरून करण्यात आले आहे. ऑक्टाव्हिया म्हणजे आठवी. ही स्कोडा ऑटो पोर्टफोलियोची आठवी गाडी आहे जी दुसऱ्या महायुद्धानंतर सादर करण्यात आली, त्याचप्रमाणे प्रत्येक चाकासाठी स्वतंत्र अत्याधुनिक सस्पेन्शन असलेली आठवी गाडी आहे.

  मुंबई : स्कोडा ऑक्टाव्हिया इंडियातर्फे औरंगाबाद येथील शेंद्रामध्ये नव्या ऑक्टिव्हियाचा निर्मिती कारखाना सुरू झाला. लाव्हा ब्ल्यू गाडीवर लॉरेन अँड क्लेमेंटचा बॅज आहे. या माध्यमातून, दीर्घकाळापासून मोटार निर्मितीमध्ये असलेले झेक उत्पादक आणि त्यांच्या १२५ वर्षांचा समृद्ध इतिहास व वारसा यांना मानवंदना देण्यात आली आहे. या महिन्याच्या अखेरीस स्कोडाची ही नवीन भेट सादर करण्यात येणार असून या गाडीची संरचना ऑक्टाव्हियाच्या भक्कम वारशाला अनुसरून आहे आणि ही गाडी तंत्रज्ञान, फीचर्स आणि एकूणच लक्झरी क्वोशंटच्या बाबतीत पुढील पातळी गाठणार आहे.

  स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक झॅक हॉलिस म्हणाले, “स्कोडा ऑक्टाव्हियाने नेहमीच ब्रँडचे आकर्षक डिझाइन, उत्कृष्ट आंतररचना, या वर्गातील सर्वोत्कृष्ट सुरक्षितता आणि इंटेलिजंट कनेक्टिव्हिटी फीचर्सची सांगड घातली आहे आणि या नव्या स्वरुपात हा मापदंड अजूनच उंचावण्यात आला आहे. गेल्या २० वर्षांत लाभलेले एक लाख समाधानी ग्राहक हे भारतातील सतत बदलणाऱ्या ऑटोमोटिव्ह मार्केटमधील चोखंदळ कार खरेदीदारांमध्ये असलेल्या भक्कम इक्विटीचे द्योतक आहे. निर्मितीची सुरुवात करण्यासोबतच भारतात आमचे अस्तित्व वाढविण्याच्या दृष्टीने आम्ही अधिक भक्कम प्रोडक्ट पोर्टफोलियोसाठी प्रतिबद्ध आहोत. आमच्या ग्राहककेंद्री दृष्टिकोनाच्या अनुषंगाने अतुलनीय ओनरशिप अनुभव देण्यासाठी आम्ही आमचे नेटवर्क वाढवत आहोत आणि अनेक उपक्रम राबवत आहोत.”

  ऑल न्यू स्कोडा ऑक्टाव्हिया – समृद्ध वारशावरील उभारणी

  जानेवारी १९५९ मध्ये बोलेस्लाव्ह येतील म्लाडा येथील कारखान्यातून पहिली ऑक्टाव्हिया बाहेर पडली. कारच्या या मॉडेलचे नामकरण ‘ऑक्टाव्हिया’ या लॅटिन शब्दावरून करण्यात आले आहे. ऑक्टाव्हिया म्हणजे आठवी. ही स्कोडा ऑटो पोर्टफोलियोची आठवी गाडी आहे जी दुसऱ्या महायुद्धानंतर सादर करण्यात आली, त्याचप्रमाणे प्रत्येक चाकासाठी स्वतंत्र अत्याधुनिक सस्पेन्शन असलेली आठवी गाडी आहे. या व्यतिरिक्त कॉइल स्प्रिंग्ससह असलेले पुढील बाजूकडील ॲक्सेल आणि टॉर्शन बार स्टेबिलायझर यामुळे ऑक्टाव्हियाला अतुलनीय ड्रायव्हिंग डायनामिक्स आणि चालवतानाचा आरामदायीपणा प्राप्त होतो. पुढील वर्षी झालेल्या जेनेव्हा मोटर शोमध्ये स्पोर्टी स्कोडा ऑक्टाव्हिया टुरिंग स्पोर्ट (टीएस) या गाडीचा प्रीमिअर करण्यात आला. १९६१, १९६२, १९६३ या सलग तीन वर्षी या पॉवरफुल स्वरुपाने मॉन्टे कार्लो रॅलीमध्ये विजय प्राप्त करत हॅटट्रिक साधली.

  स्कोडा ऑटो फोक्सव्हॅगन समुहाचा भाग झाल्यानंतर नेमप्लेटचे पुनरुत्थान करण्यात आले आणि १९९६ साली आधुनिक युगातील ऑक्टाव्हियाची पहिली जनरेशन सादर करण्यात आली. २००१ साली झेकमधील या ऑटो क्षेत्रातील एका प्रमुख कंपनीतर्फे भारतीय उपखंडात ऑक्टाव्हियासोबत प्रवेश केला. ही कार लवकरच या ब्रँडचे चिरंतन डिझाइन, अविरत कामगिरी, उत्तम संरचना, अधिक सुरक्षितता आणि सिक्युरिटी मोड्यूल्स आणि युरोपिअन कारागिरी यांचे परिपूर्ण मिश्रण असलेली ही गाडी वाजवी किंमतीला उपलब्ध झाली. त्यामुळे स्थानिक ग्राहकांसाठी या ब्रँडसाठी व्हॅल्यू लक्झरी स्थान प्रस्थापित झाले. ऑक्टाव्हियाच्या निमित्ताने स्कोडा ऑटोने भारतातील लोकप्रिय एक्झिक्युटिव्ह सेडान सेगमेंटमध्ये पदापर्ण केले आणि या ब्रँडशी एकनिष्ठ असलेल्यांनी आणि भारतभरातील ऑटोचाहत्यांनी या गाडीचे खूप कौतुक केले.

  २००६ साली सादर करण्यात आलेल्या स्कोडा ऑक्टाव्हियासह ही यशोगाथा सुरूच राहिली. ब्रँडची ओळख झालेल्या या नव्या ऑक्टाव्हियाने नावीन्यपूर्णतेचे मापदंड पुढे नेत या गाडीत पेट्रोल वाहनांमध्ये डायरेक्ट इंजेक्शन टेक्नोलॉजी आणि ऑटोमॅटिक ड्युअल क्लच ट्रान्समिशन (डीएसजी) यांचा अंतर्भाव केला. तिसऱ्या जनरेशनच्या स्कोडा ऑक्टाव्हियाने या सेगमेंटमध्ये कार्यक्षमता, व्यवहार्यता आणि ऐसपैसपणा नवीन मापदंड स्थापन केले आणि आरएस मॉनिकरमध्ये अतुलनीय व्हॅल्यू प्रपोझिशन आणि पल्स रेसिंग यांची सांगड घालण्यात आली आहे.

  जगभरात चीन, भारत, रशिया आणि कझाकस्तान येथील कारखान्यांमध्ये ऑक्टाव्हिया या स्कोडा ऑटोच्या ६.५ मिलियन युनिट्सची निर्मिती करण्यात आली आहे. भारतात स्कोडा ऑक्टाव्हियाची १ लाख युनिट्स भारतात आली आहे, यावरूनच या कारच्या लोकप्रियतेचा पुरावा मिळतो.

  • औरंगाबादमधील कारखान्यातून नव्या स्कोडा ऑक्टाव्हियाचे पहिले युनिट पडले बाहेर
  • २००१ साली सादर करण्यात आलेल्या ऑक्टाव्हियाच्या माध्यमातून स्कोडा ऑटोचे भारतीय उपखंडात आणि लोकप्रिय एक्झिक्युटिव्ह सेडान सेगमेंटमध्ये पदार्पण केले.
  • डायनामिक परफॉरमन्स, उत्कृष्ट संरचना दर्जा, अधिक चांगली सुरक्षितता आणि युरोपिअन क्राफ्ट्समनशिप यामुळे स्कोटा ऑक्टाव्हियाच्या मागील जनरेशन्स उठून दिसत होत्या.
  • या महिन्याच्या अखेरीस चौथ्या जनरेशनची ऑक्टाव्हिया सादर करण्यात येणार असून ती या विभागाची पुनर्व्याख्या करेल आणि या सेगमेंटमध्ये आघाडीवर असेल.