कमर्शियल वाहनांमध्ये स्लीप डिटेक्शन सेन्सर बसविणार, Drivers करणार Pilot सारखी शिफ्ट ड्युटी : नितीन गडकरी

नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मंगळवारी ट्विट (Tweet) करत पायलट (Pilot) प्रमाणेच ट्रक चालकांच्या ड्रायव्हिंगच्या कामाचे तास निश्चित असायला हवेत (The working hours of the truck driver should be fixed). यामुळे थकवा आल्याने होणारे रस्ते अपघात कमी होतील असे त्यांनी नमूद केले आहे.

    नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून कमर्शियल (व्यापारी) ट्रक चालकांसाठी गाडी चालविण्याची वेळ (Fixed Time For Drivers) निश्चित करण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले आहे. याशिवाय त्यांनी कमर्शियल वाहनांमध्ये चालकाला झोप येत असेल याची माहिती मिळण्यासाठी सेन्सर (Sleep Detection Sensors) लावण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

    ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ वाहन चालविता येणार नाही

    नितीन गडकरी यांनी मंगळवारी ट्विट करत पायलट प्रमाणेच ट्रक चालकांच्या ड्रायव्हिंगच्या कामाचे तास निश्चित असायला हवेत. यामुळे थकवा आल्याने होणारे रस्ते अपघात कमी होतील असे त्यांनी नमूद केले आहे.

    युरोपीय मानकांचे पालन केले जाईल

    त्यांनी ट्विट मध्ये असंही नमूद केलं आहे की, “मी अधिकाऱ्यांना युरोपीय मानकांनुसार कमर्शियल वाहनांमध्या गाडी चालविताना झोप येत असल्याचे माहिती व्हावी याच्या सेन्सर प्रणाली बाबतही काम करण्यास सांगितले आहे.

    मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार – गडकरी

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट केले की, जिल्हा रस्ते समित्यांची नियमित बैठक बोलावण्यासाठी आपण जिल्ह्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि डीएमंना पत्र लिहिणार आहोत.

    तत्पूर्वी मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषदेत (एनआरएससी) नामांकित नवीन सदस्यांसह प्रास्ताविक बैठकीला उपस्थित राहिले. ते म्हणाले की, त्यांनी दर दोन महिन्यांनी परिषदेची बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत.