महिंद्रा थारची विक्री रोखली; ऑस्ट्रेलिया कोर्टात याचिका दाखल 

स्वदेशी वाहन निर्माती कंपनी महिंद्रा अँड महिंद्राची पॉपुलर ऑफ-रोडर 'थार' या कारला सध्या मोठी मागणी आहे. मात्र, या कारची डिझाईन कंपनीसाठी डोकेदुखी ठरली आहे. महिंद्राकडून ही एसयुव्ही ऑस्ट्रेलियन मार्केटमध्ये लाँच केली जाणार होती.

    दिल्ली :  स्वदेशी वाहन निर्माती कंपनी महिंद्रा अँड महिंद्राची पॉपुलर ऑफ-रोडर ‘थार’ या कारला सध्या मोठी मागणी आहे. मात्र, या कारची डिझाईन कंपनीसाठी डोकेदुखी ठरली आहे. महिंद्राकडून ही एसयुव्ही ऑस्ट्रेलियन मार्केटमध्ये लाँच केली जाणार होती.

    मात्र, जीप रँग्लर कंपनीने या कारच्या डिझाईनवर आक्षेप घेत ऑस्ट्रेलिया कोर्टात याचिका दाखल केली. जीप रँग्लरने महिंद्रा कंपनीवर आपले डिझाईन चोरी केल्याचा आरोप लावला आहे. याप्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू आहे. यामुळे ऑस्ट्रेलियात महिंद्रा थारची विक्री तात्पुरती रोखण्यात आली आहे.